शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

By admin | Updated: May 4, 2015 01:51 IST

महाराष्ट्र दिनाच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणप्रसंगी पालकमंत्री राजकुमार बडोले

गोंदिया : महाराष्ट्र दिनाच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणप्रसंगी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला. नक्षलग्रस्त भागामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये चिचगड ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तिवारी, कर्मचारी रमेश येळे, प्रदीप पेटकुले, विनायक आतकर, राधेश्याम गाते, वामन पारधी, उमेश इंगळे, शेखर सोनवाने, ओमप्रकाश जामनिक, लिखिराम दसरे यांचा समावेश आहे. पोलीस उपमुख्यालय देवरी येथील कोलमपुरी वैकुंठी, पोलीस खात्यात उल्लेखनिय सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र मिळणाऱ्यांमध्ये पोलीस कर्मचारी राजेंद्र खापेकर, यादोराव गौतम, शेंडे, लक्ष्मण घरत, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे येथे बालकांवर होणारे अत्याचार व बालकांच्या हक्कांची अंमलबजावणी या विषयावरील वादविवाद स्पर्धेत यशस्वी ठरलेले पोलीस उपनिरीक्षक सलमान पठान, पोलीस कर्मचारी दत्तात्रय राठोड, जिल्हा उद्योग केंद्राचा सन २०१४ चा लघुउद्योजक जिल्हा पुरस्कार राजकुमारी डोडानी, विजयकुमार मोदी, सन २०१३ चा पुरस्कार सुधीरकुमार जैन, अजीतकुमार जैन यांना प्रत्येकी १५ हजार व १० हजार रूपयांचा पुरस्कार.पर्यावरण विकासरत्न पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत पद्मपूरचे उपसरपंच पुरूषोत्तम किरणापुरे व सचिव डी.डी. मेश्राम, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा सन २०१४-१५ चा गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार मुकेश बारई, क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार सुनील शेंडे यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग निर्देशित कार्यक्रम महिला आरोग्य अभियान व बाल आरोग्य अभियान उपक्रमामध्ये उत्कृष्ट सहभाग तसेच आदिवासी व दुर्गम भागात गोरगरिबांना आरोग्य सेवा देणारे वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र जैन, डॉ. दीपक बाहेकर, डी.यू. रहांगडाले, दुलीचंद बुद्धे, डॉ. अनिल परियाल, अपूर्व अग्रवाल, डॉ. राजेंद्र अग्रवाल, डॉ. राज वाघमारे, डॉ. संजीव दोडके, डॉ. जयंत दुधे, डॉ. सुवर्णा हुबेकर, केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाचे सांख्यिकी सहायक निशांत मोहन बन्सोड, डॉ. गार्गी बाहेकर, डॉ. घनश्याम तुरकर, प्रमोद गुडधे, प्रा. सविता बेदरकर, धर्मिष्ठा सेंगर, कालुराम अग्रवाल, नवीन अग्रवाल, उत्कृष्ट तलाठी म्हणून पिंपळे या सर्वांचा पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सत्कार केला.तसेच आरोग्य विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या एच्छिक रक्तदान, नेत्रदान, बेटी बचाव अभियान, हिवताप जनजागृती मोहीम, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, पल्स पोलिओ लसीकरण, मॉ अभियान, बा अभियान, आदिवासी दुर्गम भागात कीटकजन्य आजार नियंत्रण मोहीम प्रभावीपणे राबवून युवा संघात उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याबद्दल दिव्या भगत यांचा पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी दिलीप गावडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीश कळमकर प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)