शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

बिनधास्तपणे करा वृत्तपत्रांचे वाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:00 IST

आम्ही नियमित वृत्तपत्र वाचतो. वृत्तपत्र वाचताना आम्ही ही काळजी घेतो. वृत्तपत्रांमुळे अजूनही कुणाला कोरोना झालेला नाही. वृत्तपत्र विक्रेत्यांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, मास्कचा वापर करावा, गर्दी करणे टाळावे. अचूक बातम्यांसाठी सर्वांनी वृत्तपत्र नियमितपणे वाचावे. अत्यावश्यक सेवेमध्ये वृत्तपत्रांचा समावेश केला आहे.

ठळक मुद्देअचूक माहिती मिळण्यास होते मदत : वृत्तपत्रामुळे कोरोना होतो ही केवळ अफवाच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जगात आणि देशात मागील ३ महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात वाचकांपर्यंत खरी माहिती पोहचविण्याचे काम वृत्तपत्रांनी केले.‘लोकमत’ने नेहमीच पारदर्शक पत्रकारितेवर भर दिला आहे. शिवाय वृत्तपत्रांचे वाचन केल्याने कोरोनाचा संसर्ग होतो ही केवळ अफवाच आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि तज्ज्ञांनी सुद्धा वृत्तपत्रांमुळे कोरोनाचा संसर्ग होत नसून ते पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे वाचकांनी अचूक माहिती मिळविण्यासाठी आणि सोशल मीडियावर खोट्या अफवांपासून दूर राहण्याकरिता मनात कुठलेही किंतू परंतु न ठेवता वृत्तपत्रांचे बिनधास्तपणे वाचन करावे असे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले आहे.- वृत्तपत्र विक्रेता हा आपल्या समाजाचा एक घटक आहे. आम्ही नियमित वृत्तपत्र वाचतो. वृत्तपत्र वाचताना आम्ही ही काळजी घेतो. वृत्तपत्रांमुळे अजूनही कुणाला कोरोना झालेला नाही. वृत्तपत्र विक्रेत्यांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, मास्कचा वापर करावा, गर्दी करणे टाळावे. अचूक बातम्यांसाठी सर्वांनी वृत्तपत्र नियमितपणे वाचावे. अत्यावश्यक सेवेमध्ये वृत्तपत्रांचा समावेश केला आहे. वृत्तपत्रामुळे कोरोनाची लागण होत नाही, म्हणून वृत्तपत्राला बंधने सरकारने घातलेली नाहीत. घरोघरी वृत्तपत्र वाचण्याची सवय आता पुन्हा सुरु झाली आहे. वृत्तपत्रामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही.- मंगेश शिंदे, पोलीस अधीक्षक गोंदिया.जागतिक महामारी ठरलेला कोरोना हा एकमेकांच्या संपर्कात आल्याने होतो. परंतु वृत्तपत्रांमुळे कोरोनाची लागण झाल्याचे ऐकीवात नाही. माहिती मिळविण्याचे अनेक माध्यम आहेत. परंतु बहुतांश माध्यमातून फेक न्यूजच मिळतात. सत्य व अचूक बातमी वृत्तपत्रांतूनच कळते. लॉकडाऊनच्या काळातही आम्ही नियमित वृत्तपत्र वाचले.खरी माहिती जनतेपर्यंत पोहोचविणारे वृत्तपत्र वाचकांनी बिनधास्तपणे नियमित सर्वांनी वाचावे.-विरेंद्र कटरे, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ.वृत्तपत्राचे वितरण आणि वाचन केल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होतो किंवा होऊ शकतो असे म्हणणे म्हणजे मला अंधश्रद्धाच वाटते. कारण कोरोना व्हायरस वृत्तपत्र-निर्मिती प्रक्रि येच्या दरम्यान तयार होणाऱ्या उष्णतेत टिकूच शकत नाही. हे वैज्ञानिक सत्य वारंवार सांगितले गेले आहे. शिवाय वृत्तपत्र निर्मितीनंतर त्यांच्या प्रारंभिक सॅनिटायझेशनची सुद्धा दक्षता घेण्यात येत असल्याचे वृत्तपत्रांचे चालक विश्वासपूर्वक सांगत आहेत. वृत्तपत्र वाटप करणारे सुद्धा काही वाचकांच्या प्रत्यक्ष संपर्कात येत नसून वाटपादरम्यान फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जाते. म्हणून वृत्तपत्र आणि कोरोना-संसर्ग असा कार्यकारण संबंध येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वृत्तपत्रांच्या वाचनामुळे अफवा पसरण्याचा धोकाही टळून वाचकांना यथोचित बातमी जाणता येते. आजच्या या कोरोना-काळात अफवांपासून बचाव हे महत्त्वाचे कार्य वृत्तपत्रेच बजावू शकतात. या सर्व बाबी विचारात घेता कोरोना आणि वृत्तपत्र यांचा अर्थोअर्थी संबंध येतच नाही. त्यामुळे सर्वांनी आपल्या मनातील गैरसमज दूर करुन बिनधास्तपणे वृत्तपत्रे वाचन करावे.अ‍ॅड. लखनसिंह कटरे, साहित्यिक, बोरकन्हार, जि.गोंदियावृत्तपत्र योग्य रितीने हाताळले जातात. तसेच सॅनिटायझरने त्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते. वृत्तपत्रांमुळे कोरोना होत नाही. वृत्तपत्र वाटणाऱ्यांनी मास्कचा वापर करावा. तसेच वेळोवेळी सॅनिटायझर लावावे. वृत्तपत्र विकेत्यांनी सोबत सॅनिटायझर ठेवावे. सर्वांना सत्य माहिती मिळण्यासाठी वृत्तपत्र नियमित वाचावे. सत्य आणि अचूक माहितीसाठी वृत्तपत्र हे उत्तम माध्यम आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा वृत्तपत्रांमुळे कोरोनाचा संसर्ग होत नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आतापर्यंत वृत्तपत्र वाचनामुळे एखाद्याला कोरोनाची लागण झाल्याचे ऐकिवात नाही.-डॉ. प्रेमकुमार बघेले, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र ठाणावर्तमानपत्र दररोज वाचावे. वृत्तपत्रांमुळे कोरोना होत नाही हे सिद्ध झाले आहे. सोशल मीडियावरुन फेक बातम्या जास्त येतात. परंतु वृत्तपत्र सत्य बातम्या देण्याचे काम करुन समाजात जनजागृती घडवितात. कोरोनाच्या काळातही सेवा देणारे वृत्तपत्र अत्यावश्यक सेवेत मोडले. वृत्तपत्र वाचनामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही. त्यामुळे अशा खोट्या अफवांवर वाचकांनी विश्वास न ठेवता नियमित आपल्या घरी वर्तमानपत्र बोलावून बिनधास्तपणे वाचन करावे.- डॉ. भुमेश्वर पटले, तालुका वैद्यकीय अधिकारी आमगाव

टॅग्स :Lokmatलोकमत