शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

नवीन मालमत्ता कराबाबत नागरिकांमध्ये रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 22:06 IST

शहरातील लोकांच्या मालकीचे ईमारत जमिनी अथवा भाडेकरुन कडून त्यांच्या मालमत्तेची व जागेवरची मोजणी व तपासणी करुन त्यावर योग्य मूल्य कर निर्धारण करुन याची प्रस्तावित यादी नगरपंचायत ने ३ जून रोजी प्रसिद्ध केली आणि लोकांना नोटीस ही दिल्या.

ठळक मुद्देनगर पंचायतने घेतली सभा : उत्पन्नाच्या आधारावर कर लावण्यावर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : शहरातील लोकांच्या मालकीचे ईमारत जमिनी अथवा भाडेकरुन कडून त्यांच्या मालमत्तेची व जागेवरची मोजणी व तपासणी करुन त्यावर योग्य मूल्य कर निर्धारण करुन याची प्रस्तावित यादी नगरपंचायत ने ३ जून रोजी प्रसिद्ध केली आणि लोकांना नोटीस ही दिल्या. यात त्यांना नियमित येणाऱ्या मामलत्ता करापेक्षा १० ते १५ पट जास्त कर लावण्यात येत असल्याने या विषयी लोकांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण होत आहे. यावर नगरपंचायतने या नवीन कराविषयी आक्षेप नोंदविण्याकरिता येथील व्यापारी व प्रतिष्ठित नागरिकांची सभा बुधवारी (दि.१२) नगरपंचायतच्या सभागृहात घेतली.या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष कौशल कुंभरे होत्या. याप्रसंगी उपाध्यक्ष आफताब शेख, मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, सर्व नगरसेवक, महाराष्टÑ प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे, तालुका राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा स्विकृत नगरसेवक महेशकुमार जैन, तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राधेश्याम बगडीया, व्यापारी नरेंद्र जैन, संपतलाल अग्रवाल, दीपक अग्रवाल, अ‍ॅड. प्रशांत संगीडवार यांच्यासह शहरातील सर्व व्यपारी व प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.या सभेत प्रस्तावित नवीन मालमत्ता कर या संबंधात चर्चा करुन शासनाच्या निकष व येथील लोकांच्या उत्पन्नाच्या आधारे नवीन कर लावावा या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी नगराध्यक्ष कुंभरे, उपाध्यक्ष शेख व मुख्याधिकारी चिखलखुंदे यांनी लोकांना सांगितले की, ही नवीन कराची प्रस्तावित यादी व नोटीस लोकांच्या माहिती करिता देण्यात आली असून यावर लोकांच्या ईमारती व जागेचे मुल्यमापन बरोबर झाले किंवा नाही आणि नवीन कराबाबत आपले आक्षेप मागविण्याकरिता दिले आहे.तसेच नगरपंचायतचे सर्व पदाधिकारी स्थानिक असल्याने येथील लोकांवर कुठल्याही परिस्थितीत जास्त प्रमाणावर नवीन कर न लावता शासनाच्या निकषाप्रमाणे कर लावण्यात येईल असे सांगितले. आभार चिखलखुंदे यांनी मानले.

टॅग्स :Taxकर