शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

मामा तलावांच्या पुनरूज्जीवनामुळे शेतकरी होणार समृद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:50 IST

जिल्ह्याची ओळख तलावांचा जिल्हा म्हणून आहे. जिल्ह्यातील तलावांत गाळ साचल्यामुळे पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. माजी मालगुजारी तलावांच्या पुनरूज्जीवन कार्यक्र मामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण होईल.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : डव्वा येथे माजी मालगुजारी तलाव खोलीकरणाला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्याची ओळख तलावांचा जिल्हा म्हणून आहे. जिल्ह्यातील तलावांत गाळ साचल्यामुळे पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. माजी मालगुजारी तलावांच्या पुनरूज्जीवन कार्यक्र मामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण होईल. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार असून शेतकरी समृध्द होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथील तलाव परिसरात १२ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागांतर्गत माजी मालगुजारी तलाव पुनरूज्जीवन कार्यक्रमांतर्गत तलावाच्या खोलीकरणाच्या कामाची सुरूवात पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी ते बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवणे, पंचायत समिती सभापती गिरीधारी हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, पंचायत समिती सदस्य जयशीला जोशी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉ. भुमेश्वर पटले, सरपंच पुष्पमाला बडोले, उपसरपंच चेतन वडगाये यांची उपस्थिती होती.बडोले म्हणाले, तलावाचे खोलीकरण करीत असताना डव्वा हे गाव जलयुक्त शिवार अभियानात घेतले होते. यावर्षी ४५० मामा तलावांचे खोलीकरण करण्यात येणार आहे. उर्वरित तलांवाचे खोलीकरण पुढील वर्षात करण्यात येईल. या गावाच्या परिसरातील तलावांचे देखील खोलीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे मुबलक पाणीसाठा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.विकासाच्या संदर्भात राजकारण बाजूला ठेवून काम करीत असल्याचे सांगून बडोले म्हणाले की, त्यामुळे गावाची विकास कामे मार्गी लागत आहे. या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना अनेक विंधन विहिरी दिल्या. मुख्यमंत्री पेयजल योजनेत डव्वाची निवड केली. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला जाणार आहे. पाणी पुरवठा योजनेच्या कामात गुणवत्ता असली पाहिजे. याची खबरदारी पाणी पुरवठा विभागाने घ्यावी. ही योजना भविष्यात सौर उर्जेवर आणण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करु न देण्यात येईल. त्यामुळे वीज बिलात मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.सोनवणे म्हणाल्या, या तलावातील गाळ काढण्यात येणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढण्यास मदत होईल. पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सोडविला जाईल. कृषी विभागाच्या अनेक योजना आहेत. त्या योजनांचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.परशुरामकर म्हणाले, शेतकºयांना सिंचनाची व्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी माजी मालगुजारी तलावातील गाळ काढण्याचा कार्यक्र म हा शासनाचा कौतुकास्पद कार्यक्र म आहे. या कार्यक्र मामुळे तलांवातील गाळ काढण्याचे काम सुरु झाले आहे. डव्वासाठी पाणी पुरवठा योजना सुरु झाल्यावर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी सरपंच बडोले यांनीही मनोगत व्यक्त केले.तत्पूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते डव्वा येथील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या कामाचे भूमिपूजन चुलबंद नदीच्या काठावर करण्यात आले. या योजनेच्या कामावर ८६ लाख ४८ हजार १७० रु पये खर्च करण्यात येणार आहे. सन २०३३ ची लोकसंख्या गृहीत धरु न प्रती व्यक्ती ४० लिटर पाणी पुरवठा याप्रमाणे एक लाख ६५ हजार ६८० लिटर पाणी पुरवठा दररोज करण्यात येणार आहे. डव्वा येथील ७९६ कुटुंबातील ३४१८ व्यक्तींसाठी ही योजना कार्यान्वित होणार आहे.डव्वा येथील माजी मालगुजारी तलावाच्या पुनरूज्जीवन कार्यक्रमांतर्गत करण्यात येणाºया तलावांच्या खोलीकरणाच्या कामावर ४१ लाख रूपये खर्च होणार आहेत. यातून ८९ हेक्टर शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार असून २० टीएमसी पाणीसाठा वाढणार आहे. १३ हजार क्युबिक मीटर गाळ या तलावातून काढण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शेगावकर, उपविभागीय अभियंता सुभाष कापगते, शाखा अभियंता वाघमारे, राठोड यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक उपसरपंच चेतन वडगाये यांनी मांडले. संचालन विलास चव्हाण यांनी केले. आभार शहा यांनी मानले.