शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या नुकसानीने शेतकरी धास्तावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:27 IST

दुग्ध भेसळीचे आंतरराज्य कनेक्शन एकोडी : दुधाची आवक कमी होऊनही दुधाचे वितरण व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करण्यात येत आहे. ...

दुग्ध भेसळीचे आंतरराज्य कनेक्शन

एकोडी : दुधाची आवक कमी होऊनही दुधाचे वितरण व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करण्यात येत आहे. दुधात भेसळ करून हे पदार्थ तयार करण्याचा सपाटा सुरू आहे. एका महिन्यापूर्वी येथील दोन दूध संकलन व वितरण केंद्रांवर संबंधित विभागाने चौकशी केली होती. ही चौकशी नियमित होती की काही गौडबंगाल होते, हे गुलदस्त्यात आहे.

बँकेत दलालांमार्फत सर्वसामान्यांची लूट

आमगाव : तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तत्काळ होत असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे.

शेतशिवारात माकडांच्या उच्छादात वाढ

सालेकसा : शेतशिवार मोकळे झाले आहे. याचा फायदा आता माकडांना होत असून भाजीपाला पिकांमध्ये माकडांचा उच्छाद सुरू आहे. काही शेतकरी शेतात जाऊन माकडांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु कोणालाही यश येत नाही. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

मोकाट जनावरांमुळे वाहतुकीत अडथळा

तिरोडा : शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मात्र याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. मोकाट जनावरांमुळे बाजारपेठेत जास्तच त्रास असून वाहतूक विस्कळीत होते. मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम राबविण्याची मागणी आहे.

शिपाई भरतीची वयोमर्यादा वाढवा

साखरीटोला : मागील २-३ वर्षांपासून पोलीस शिपाई भरती प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुण बेरोजगार आहेत. ते पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांच्या दृष्टिकोनातून पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ३३ वर्षांवरून ३५ वर्षे करण्यात यावी, अशी मागणी बेरोजगार तरुणांकडून केली जात आहे.

शेंडा परिसरात नेटवर्कची समस्या

सडक अर्जुनी : तालुक्यातील ग्राम कन्हारपायली, शेंडा, आपकरीटोला, उशिखेडा, पाटीलटोला, लेंदिटोला, मोहघाटा, दल्ली, लेंडीटोला, हलबीटोला, पांढरी, सिंदिपार, सलाईटोला, मुशानझोरवा या गावांत टॉवर नसल्याने ग्राहकांची अडचण होते. नेटवर्कची समस्या सोडविण्याची मागणी परिसरातील मोबाइलधारक नागरिक करीत आहेत.

धान कापणी यंत्रामुळे मजुरांवर संकट

गोरेगाव : अलीकडे झटपट शेतीची कामे उरकून घेण्याच्या नादात शेतकरी परराज्यातून धान मळणी व कापणी यंत्र (कल्टीव्हेटर) बोलावून आपल्या शेतातील धान कापणी व मळणी सोबतच करीत असल्यामुळे धान कापणाऱ्या मजुरांना काम मिळणे कठीण झाले आहे. कोरोनामु‌ळे कित्येकांच्या हातचे काम गेले व त्यात आता शेतातही यंत्र आल्याने मजूर अडचणीत आले आहेत.

नाल्यांअभावी पाणी वाहते रस्त्यांवरून

गोंदिया : ग्रामीण भागात सिमेंटचे रस्ते करण्यात आले. मात्र, पुरेशा नाल्या खोदल्या नाहीत. ज्या ठिकाणी नाल्या खोदल्या तेथील नाल्याही नागरिकांनी बुजवून टाकल्या. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे.

जिल्ह्यात कृषीपंप चोरटे सक्रिय

बोंडगावदेवी : सिंचनासाठी विहीर, नदीनाल्यावर लावलेले कृषीपंप चोरीस जाण्याच्या घटनांत जिल्ह्यात वाढ झाली आहे. दररोज कुठे ना कुठे चोरीची घटना घडत असून एखादी टोळी सक्रिय असावी असे वाटते.

गौण खनिज चोरीकडे शासनाचे दुर्लक्ष

गोंदिया : महसूल आणि वनविभागाच्या हद्दीतील गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. परंतु महसूल विभाग रेती तस्करांच्या मागावर असून मुरूम, दगड चोरट्यांना रान मोकळे आहे.

हॉर्नमुळे शहरातील नागरिक त्रस्त

गोंदिया : शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यात काही कर्णकर्कश हॉर्न लावून घेत आहेत. यामुळे नागरिकांना त्रास होत असून वाहतूक विभागाने अशांवर कारवाई करण्याची गरज आहे.

निर्मलग्राम योजनेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

केशोरी : महाराष्ट्र शासनाने हागणदारीमुक्त गाव अभियान राबवून परिसरातील निर्मलग्राम योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या ग्रामपंचायतींना अतिरिक्त विकास निधीसह रोख पारितोषिक दिले, परंतु निर्मलग्राम अंतर्गत बहाल केलेल्या गावांची स्थिती बघता या योजनेकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

अर्जुनी-मोरगाव ते कोहमारा बस सुरू करून फेऱ्या वाढवा

बाराभाटी : कोरोनामुळे बंद पडलेली राज्य परिवहन महामंडळाची बससेवा आता हळूहळ‌ू सावरताना दिसत आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सामान्य नागरिकांना प्रवास करायला फक्त बस सुविधा आहे. मात्र, या मार्गावर काही निवडकच बस धावतात. त्यामुळे प्रवास सुरळीत व वेळेच्या आत होत नाही. याकरिता अर्जुनी-मोरगाव ते कोहमारा बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.