शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

मजुरी वाढल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:53 IST

बेरोजगारांच्या हाताला काम द्या अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील युवकांना रोजगार मिळावा, यासाठी शासनाने उद्योगांसाठी जागा उपलब्ध करून दिली. मात्र, ...

बेरोजगारांच्या हाताला काम द्या

अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील युवकांना रोजगार मिळावा, यासाठी शासनाने उद्योगांसाठी जागा उपलब्ध करून दिली. मात्र, मोठ्या उद्योगाचा पत्ता नाही. त्यामुळे तालुक्यात बेरोजगारांची संख्या वाढत असून स्थानिक युवकांना रोजगारांसाठी भटकंती करावी लागत आहे. तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. मात्र धानावर आधारित उद्योग नसल्याने युवकांच्या हाताला काम मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे बेरोजगारांनी काम मिळवून देण्याची मागणी केली जात आहे.

व्यायामशाळा उभारण्याची मागणी

सालेकसा : तालुक्यातील काही गावात व्यायाम शाळा नसल्याने युवकांना अडचण जात आहे. त्यामुळे व्यायमशाळा मंजूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. तालुक्यातील अनेक गावात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून व्यायामशाळा निर्माण झाल्या आहेत. मात्र अजूनही काही गावांत व्यायामशाळा नाही. यावर्षी कोरोनामुळे व्यायाम केंद्रावर निर्बंध आले आहे. मात्र भविष्यात गावातील युवकांना व्यायाम करण्यासाठी सोपे होईल.

अर्धवट बांधकामाचा बसतोय फटका

गोरेगाव : गोंदिया-बल्लारशा रेल्वेमार्गावर फाटक नसलेल्या ठिकाणी अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे़ त्यातच अपुऱ्या मनुष्यबळाअभावी रेल्वेमार्गावर फाटक उभारण्यास अडचणी निर्माण होत असल्याने रेल्वे विभागाकडून मागील १० ते १५ वर्षांपूर्वी अनेक रेल्वेमार्गावर बोगद्याचे काम सुरू आहे. पण हे काम अजुनही पूर्ण झाले नसल्याने याचा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर

गोंदिया : येथील रेल्वे स्थानक लगत प्रभू रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. कित्येकदा त्यातून दुर्गंध सुद्धा पसरतो. त्यामुळे या परिसरात घाणचघाण पसरून दुर्गंधीयुक्त वातावरण तयार होते. परिणामी जनतेच्या आरोग्यावर प्रभाव पडतो.

वृक्षतोडीनंतर वृक्षांची सर्रास वाहतूक

अर्जुनी-मोरगाव : शेतशिवारासह जंगलात असलेल्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू झाली आहे. अनेकदा अशी वृक्षतोड करताना वनविभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे.

कामगारांची योजना पूर्ववत सुरू करा

गोंदिया : कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम करणाऱ्या मजुरांना थेट पाच हजार रुपये देण्याची योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी कामगारांकडून होत आहे.

ग्रामीण भागात माकडांचा आतंक

पांढरी : सध्या सगळीकडे शेतीची कामे सुरु आहे. शेतात नागरिकांची उपस्थिती असल्यामुळे माकडांनी गावाकडे धाव घेतली आहे. माकडे गावात येवून घराचे व भाजीपाल्याचे नुकसान करीत आहेत.

महिलांना जनधनच्या मानधनाची प्रतीक्षा

गोरेगाव: गरीब महिलांना आर्थिक बळ म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत महिलांच्या जनधन बचत खात्यात अनुदान जमा केले होते. मात्र आता अनुदान जमा झालेले नाही.

नाल्यांअभावी सांडपाणी रस्त्यावर

गोंदिया : ग्रामीण भागात सिमेंटचे रस्ते करण्यात आले. मात्र, पुरेशा नाल्या खोदल्या नाहीत. ज्या ठिकाणी नाल्या खोदल्या तेथील नाल्याही नागरिकांनी बुजवून टाकल्या आहेत.

शेतकरी वळले सौरपंप संयंत्राकडे

केशोरी : अलीकडे महावितरण कंपनीच्या भरमसाट दरवाढीमुळे शेतकऱ्यांना शेतीच्या भरवशावर वीजबिल भरणे परवडणारे नाही. यामुळे या परिसरातील शेतकरी सौरपंप संयंत्राकडे वळत आहेत.

सुरक्षा कवचाविना डीपी धोकादायक

सालेकसा : अनेक ठिकाणी वीज कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. वीज प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे मोठा धोक्याची शक्यता नाकारता येत नाही.

मोफत रेतीसाठी लाभार्थ्यांची पायपीट

परसवाडा : पतंप्रधान घरकुल योजनेंतर्गत आता ५ ब्रास रेती मोफत देण्यास मंजुरी दिली आहे. तहसीलदारांमार्फत रेतीचे वितरण केले जात असल्याने लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लगात आहेत. तर कर्मचारी त्यांची टोलवाटोलवी करीत असल्याने आता लाभार्थ्यांना पाटपीट करावी लागत आहे.

बसस्थानक परिसरातील वाहतुकीची कोंडी

केशोरी : येथील बसस्थानक परिसरातील जागेत खासगी व्यावसायिकांनी दुकाने गाठून शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यामुळे परिवहन मंडळाच्या बसेसला परत फिरविण्यासाठी जागा शिल्लक राहत नसल्याने बसस्थानकावर वाहतुकीची कोंडी होत आहे. येथील ग्रामपंचायत प्रशासन दुकानदारांचे हित जोपासून अतिक्रमण हटविण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.