शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

By अंकुश गुंडावार | Updated: July 25, 2023 18:54 IST

श्रीकृष्ण जगन भोयर (३६) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

देवरी : शेतकऱ्याने शेतालगत असलेल्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.२५) सकाळी तालुक्यातील ग्रामपंचायत गोटाबोडी अंतर्गत येणाऱ्या आवरीटोला येथे उघडकीस आली. श्रीकृष्ण जगन भोयर (३६) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार श्रीकृष्ण भोयर हे शेतात रोवणीच्या कामासाठी जातो असे सांगून मंगळवारी सकाळी ८ वाजता शेतात गेला. तो मजुरांसोबत शेतीची कामे करीत होता. दरम्यान, पाण्याचे इंजिन बंद करून येतो म्हणून त्याने मजुरांना सांगितले. अर्धा तास लोटूनही तो परत न आल्याने मजुरांनी व त्याच्या चुलत भावाने त्याचा शोध घेणे सुरू केले. दरम्यान, तो शेतालगत असलेल्या नाल्याजवळ आंजनाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला.मजुरांनी त्याला खाली उतरवून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय देवरी येथे आणले असता डॉक्टरांनी श्रीकृष्णला मृत घोषित केले. श्रीकृष्णने नेमकी कुठल्या कारणावरून आत्महत्या केली हे मात्र कळू शकले नाही. त्याच्या पश्चात दोन मुले, पत्नी असा आप्त परिवार आहे. देवरी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून, पुढील तपास पो.ह. ग्यानिराम करंजेकर करीत आहेत. 

टॅग्स :Farmerशेतकरी