शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

नेटवर्कच्या शोधात शेतकरी धुऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 05:00 IST

तालुक्यात फोरजी नेटवर्क सेवा देण्यासाठी मोठमोठे टॉवर लावले गेले आहेत. परंतु ही सेवा टूजी सेवेपेक्षा कमकुवत असल्याने अनेक शेतकऱ्यांना ही लिंक उघडता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ॲप्समध्ये पिकाची नोंद करताना अडचण निर्माण होत आहे.  दरम्यान, सरकारने कृषी विभाग, तलाठी,  ग्रामसेवकांना ई-पीक पाहणीचे काम द्यावे, अशी मागणी होत आहे. 

लोकमत न्युज नेटवर्कगोरेगाव : शेतकऱ्यांनी स्वत:च्या खरीप धानपिकाची माहिती स्वत: ॲण्ड्राईड मोबाईलद्वारे भरावी व इतर योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी ई-पीक पाहणी ॲप्सकरिता लिंक दिली. परंतु तालुक्यात मोबाईल नेटवर्क सुविधा फोरजी असूनसुद्धा काम करत नसल्याने ही ई-पीक पाहणी मोहीम नेटवर्कअभावी अडचणीत आली आहे. तर पीक नोंदणीसाठी शेतकरी नेटवर्कच्या शाेधात धुऱ्यावर असल्याचे चित्र आहे. सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नवीन तंत्राचा वापर करुन ई-पीक पाहणी ॲप्स तयार केला. त्यात लिंक देण्यात आल्याने मोबाईल नेटवर्कची गरज आहे. तालुक्यात फोरजी नेटवर्क सेवा देण्यासाठी मोठमोठे टॉवर लावले गेले आहेत. परंतु ही सेवा टूजी सेवेपेक्षा कमकुवत असल्याने अनेक शेतकऱ्यांना ही लिंक उघडता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ॲप्समध्ये पिकाची नोंद करताना अडचण निर्माण होत आहे. दरम्यान, सरकारने कृषी विभाग, तलाठी,  ग्रामसेवकांना ई-पीक पाहणीचे काम द्यावे, अशी मागणी होत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या इतर योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी सरकारने पाऊल उचलण्याची गरज आहे. असेही बोलले जात आहे. 

तलाठ्यांना प्रशिक्षण मग शेतकऱ्यांना का नाही?- सरकारने २० सप्टेंबरपर्यंत ई-पीक पाहणी करण्याची मुदत दिली आहे. त्याशिवाय विमा, कर्ज व योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. पण खेड्यापाड्यात मोबाईल नेटवर्क सुविधा सुरळीत करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. पिकांची नोंदी लिहून घेण्यासाठी तलाठ्यांना ॲप्स कसे उघडावे, नोंदी कशा घ्याव्यात, याचे प्रशिक्षण देण्यात आले. परंतु शेतकऱ्यांना वगळण्यात आले. त्यातच गावातील महत्त्वाचा दुवा समजल्या जाणाऱ्या ग्रामसेवक व कृषी विभागास कोणत्याही प्रकारची जबाबदारी दिली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नो नेटवर्कमध्ये ई-पीक पाहणी कशी करावी? असा प्रश्न पडला आहे.

सरकारने नेटवर्कची समस्या आधी सोडवावी, नाही तर ई-पीक पाहणी मोहीम शेतकऱ्यांकडून न राबविता तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवकांकडून राबवावी, शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा.-चिंतामण बिसेन, शेतकरी 

 

टॅग्स :FarmerशेतकरीMobileमोबाइल