शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

गोरखनाथ धानामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:05 IST

पूर्व विदर्भातील शेतकऱ्याला धानाच्या शेतीशिवाय पर्याय नाही. गोंदिया जिल्ह्यात यंदा १४० फोर्ड गोरखनाथ या प्रजातीचे धान ज्या-ज्या शेतकऱ्यांनी लावले त्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. १४० दिवसाचे जे धान लावण्यात आले ते धान फक्त ७० दिवसातच निघाले आणि तेही धान पोचट आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या कृषी विभागाला तक्रारी । पोचट धानाचा अहवाल जिल्हा कृषी अधिकाऱ्याने मागविला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कर्जाचे डोंगर कमी करण्यासाठी शेतात राबराब राबणाऱ्या जिल्हाभरातील अनेक शेतकºयांची यंदा फसवणूक झाली. १४० दिवसात निघणाऱ्या धानाचे बियाणे शेतकऱ्यांनी लावले. मात्र ते धान ७० दिवसातच निघाले. हा प्रकार डव्वा येथे उघडकीस आल्यानंतर हे बियाणे लावणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या धानाची पाहणी केली. परिणामी त्यांचीही फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार करायला सुरूवात केली आहे.पूर्व विदर्भातील शेतकऱ्याला धानाच्या शेतीशिवाय पर्याय नाही. गोंदिया जिल्ह्यात यंदा १४० फोर्ड गोरखनाथ या प्रजातीचे धान ज्या-ज्या शेतकऱ्यांनी लावले त्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. १४० दिवसाचे जे धान लावण्यात आले ते धान फक्त ७० दिवसातच निघाले आणि तेही धान पोचट आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. लाखो रूपये खर्च करून शेतात राबराब राबूनही कवडीचे धान घरात जाणार नसल्याचे शेतकऱ्यांना संपूर्ण खरीप हंगामाला मुकावे लागणार आहे. शिवाय धानाच्या लागवडीसाठी केलेला खर्च सुध्दा वाया जाणार असून शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.गोंदिया जिल्ह्यातील सडक-अजुनी तालुक्याच्या डव्वा, चिरचाळी, डोंगरगाव व कोदामेळी या चार गावातील शेतकऱ्यांचे धान पोचट निघाल्याने त्यांनी जिल्हा कृषी अधिकारी अनूप शुक्ला यांच्याकडे तक्रार केली. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करताच ज्या शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात ह्या धानाची लागवड केली त्या धानाची पाहणी केली. त्यांच्यासोबत फसवणूक झाल्याचे लक्षात आले असता त्यांनी आपापल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. नाथ बायोजीनिक्स या कंपनीचे फोरर्ड १४० गोरखनाथ या नावाचे धान ज्या शेतकऱ्यांनी लावले त्यांचे १४० दिवसाचे धान ७० दिवसातच पोचट निघत आहेत.यासंदर्भात देवरी तालुक्याच्या शिलापूर येथील येथील अरूण सखाराम मेंढे व सडक-अर्जुनी तालुक्यातील राका येथील शेतकऱ्यांच्या शेतातही असेच घडले. ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली त्या शेतकºयांना कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली.कृषी अधीक्षक कार्यालयाकडून चौकशी१४० फोर्ड गोरखनाथ ह्या धानाचे बियाणे ज्या शेतकऱ्यांनी लावले त्या शेतकऱ्यांचे १४० दिवसाचे धान ७० दिवसातच पोचट निघाले.लोकमतने यावर वृत्त प्रकाशित करताच खळबळून जागा झालेल्या कृषी अधीक्षक कार्यालयामार्फत कोणकोणत्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली, या संदर्भात चौकशी करणे सुरू केले आहे.जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिले पत्रगोरखनाथ नावाचे जे बियाणे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लावले त्या शेतकऱ्यांचे धान १४० दिवसापेक्षा ७० दिवसातच निघाले का ज्यांच्या शेतात असा प्रकार घडला असेल अश्या शेतकऱ्यांनी आपापल्या तक्रारी आपल्या तालुक्यातील जि.प.चे कृषी अधिकारी व स्टेटचे कृषी अधिकारी यांच्याकडे करावी. संबधीत तालुका कृषी अधिकाऱ्यांची या प्रकरणाची चौकशी करण्याचे पत्र जिल्हा कृषी संवर्धन अधिकारी यांनी दिले आहे.ज्या शेतकºयांच्या शेतातील धान पोचट निघत आहेत. त्या शेतकऱ्यांनी भात बियाणाची खरेदी केली त्याचे बिल सांभाळून ठेवावे. यासंदर्भात रितसर तक्रार तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे करावे.-अनुप शुक्ला, जिल्हा कृषी अधिकारी, जि.प. गोंदिया.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती