शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खरीपानंतर रब्बीकडूनही शेतकऱ्यांची निराशाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:50 IST

पर्यावरणातील बदलाचे परिणाम झपाट्याने शेतीवर होत आहे. निसर्गाचा समतोल ढासळल्याने पर्जन्यमानात सुद्धा दिवसेंदिवस घट होत असल्याने त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मागील वर्षी खरीप हंगामात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने खरीप हंगाम हातून गेला.

ठळक मुद्देमागील वर्षीच्या तुलनेत उत्पादनात ९० टक्के घट : धान खरेदीवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पर्यावरणातील बदलाचे परिणाम झपाट्याने शेतीवर होत आहे. निसर्गाचा समतोल ढासळल्याने पर्जन्यमानात सुद्धा दिवसेंदिवस घट होत असल्याने त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मागील वर्षी खरीप हंगामात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने खरीप हंगाम हातून गेला. त्यामुळे ही भरपाई रब्बी हंगामात भरुन काढू अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र यातही त्यांची निराशाच झाली.जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी धानाची ३० हजार हेक्टरवर लागवड केली जाते. मात्र मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने व सिंचन प्रकल्पाचे पाणी रब्बी हंगामातील पिकांना देण्यास शासनाने मनाई केली होती. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी रब्बीची लागवड केली नाही.त्यामुळे रब्बी हंगामातील धानाच्या लागवड क्षेत्रात सुध्दा घट झाली. तर वातावरणातील बदलाचा सुद्धा उत्पादनावर परिणाम झाला. मागील वर्षी रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ५ जूनपर्यंत एकूण ५६ धान खरेदी केंद्रावरुन १ लाख ४६ हजार ७६२ क्विंटल धानाची खरेदी केली होती. तर यंदा केवळ १५ हजार ५०१ क्विंटल धानाची खरेदी केली आहे.मागील वर्षीच्या तुलनेत लागवड क्षेत्रात पाच हजार हेक्टरने घट झाली त्यामुळे उत्पादनात ४० हजार क्विंटलने घट ग्राह्य आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत निम्मे सुध्दा धानाचे उत्पादन झालेले नाही.धानाच्या उत्पादनात ९० टक्के घट झाली असून त्याचा फटका शेतकºयांना बसल्याने त्यांचे कंबरडे मोडले आहे.पिकांचा पॅर्टन बदलण्याची गरजजिल्ह्यातील शेतकरी अद्यापही पारंपरिक पिकांची लागवड करतात. एकाच प्रकारच्या पिकांच्या लागवडीमुळे जमिनीची पोषकता कमी होत चालली आहे. त्याचाच परिणाम उत्पादनावर होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांना बगल देत इतर कमी पाण्याच्या पिकांची लागवड करण्याची गरज असल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.चिंता कायमरब्बी हंगामातील उत्पादनानंतर हाती येणाऱ्या पैशातून जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाची तयारी करतात. खते, बियाणे, मजुरांचा खर्च तसेच पेरणीपूर्व मशागतीच्या कामासाठी खर्च करतात. मात्र मागील वर्षी खरीपानंतर रब्बी हंगाम सुध्दा शेतकºयांच्या हातून गेल्याने खरीप हंगामात पैशाची जुळवाजुळव कुठून करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी