शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी पीक कर्जापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:34 IST

साखरीटोला : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सातगावचे व्यवस्थापक लग्नाच्या सुटीवर गेल्याने शेतकरी अडचणीत सापडले असून पीक कर्ज कोण देईल ...

साखरीटोला : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सातगावचे व्यवस्थापक लग्नाच्या सुटीवर गेल्याने शेतकरी अडचणीत सापडले असून पीक कर्ज कोण देईल असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

सध्या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुरु आहे. त्यामुळे शेतकरी पीक कर्जाची उचल करतात, परंतु बँकेच्या टाळाटाळीमुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज काढण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करुन बऱ्याच शेतकऱ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सातगाव येथे सादर केले आहेत. आज होईल, उद्या होईल असे सांगत व्यवस्थापकाने बरेच अर्ज वेटिंग ठेवले आहे. ऐन पीक कर्ज देण्याच्या वेळी व्यवस्थापक रजेवर गेले त्यामुळे बरेच शेतकरी त्रस्त झाले आहेत. कागदपत्रांची पूर्तता करुन ही पीक कर्ज दिले नाही आणि ऐन वेळेवर सुटीवर गेल्याने आता कर्ज कोण देणार असा प्रश्न पडला आहे. याबाबत बँकेत चौकशी केली असता २६ जुलैपर्यंत व्यवस्थापक श्रीवास्तव रजेवर असल्याची माहिती आहे. त्यांच्या अनुपस्थितीत आम्हाला कर्ज देता येत नाही, असे बँकेतील इतर कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मागील वर्षी सुद्धा हीच गत होती. जुलै महिन्यात कर्ज मिळणे कठीण आहे. शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर देण्याची सूचना केली असताना सुद्धा व्यवस्थापकामुळे परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मॅनेजरची व्यवस्था करावी व शेतकऱ्यांना दिलासा घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.