शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलन करायला शेतकरी उतरले विहिरीत; अखेरीस पोलिसांनी काढले बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 17:16 IST

शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ३० ऑगस्ट रोजी एक अनोखे आंदोलन केले.

ठळक मुद्देगोंदिया जिल्ह्यातील भजेपार येथील घटनाधडक सिंचन विहिरीचा थकीत निधी द्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीचे बांधकाम धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांना अद्यापही सिंचन विहिरीचे अनुदान दिले नाही. शिवाय वीज जोडणी ही देण्यात आलेली नाही. संबंधित विभाग आणि शासनाला अनेकदा निवेदन देऊन सुद्धा त्याची दखल घेण्यात आली नाही. ही समस्या मार्गी न लावल्याने सोमवारी (दि.३०) ऑगस्ट रोजी प्रहारचे कार्यकर्त्यांनी विहिरीत बसून आंदोलन केले आहे. (Farmers came down to the well to protest; Eventually the police pulled him out)

सालेकसा तालुक्याच्या भजेपार येथील चार शेतकरी तथा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी विहीरीत बसून आंदोलनाला सुरुवात केली आहे. भजेपार येथील प्रल्हाद बहेकार, टाईकराम ब्राम्हणकर, छगन बहेकार व रघुनाथ चुटे या चौघांनी सोमवारी सकाळी ७ वाजता विहिरीत बसून आंदोलन केले.

सालेकसा तालुक्यातील भजेपार येथील लाभार्थी शेतकरी यांच्या शेतात धडक सिंचन योजनेंतर्गत विहिरीचे बांधकाम करण्यात आले. भजेपार येथील लाभार्थी पुरुषोत्तम बहेकार व भाडीपार येथील अनंतराम गेडाम यांच्या शेतात योजनेंतर्गत विहिरीचे बांधकाम करण्यात आले. मात्र पाच ते सहा वर्षांचा कालावधी लोटूनही त्यांना अनुदानाची रक्कम देण्यात आली नाही. ज्या विहिरीचे बांधकाम पूर्ण झाले आहे त्या विहिरींपर्यंत वीज जोडण्यात आली नाही. योजनेची रक्कम व वीज जोडणी उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी अनेकदा संबंधित विभागाकडे करण्यात आली. पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही.

त्यामुळे सोमवारी या चार शेतकऱ्यांनी विहिरीत बसून आंदोलन केले. याची मािहती मिळताच लघु पाटबंधारे जिल्हा परिषद गोंदियाचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी व सालेकसाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सालेकसाचे ठाणेदार राऊत व त्यांच्या पोलिसांनी या शेतकऱ्यांना शेततातील विहिरीतून बाहेर काढले.

टॅग्स :agitationआंदोलन