शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

कुटुंबीय वाऱ्यावर

By admin | Updated: March 17, 2017 01:34 IST

अंशदायी पेन्शन योजना लागू असलेल्यांपैकी मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना पेन्शनचा लाभ देण्याच्या घोषणेचा शासनाला पूर्णत: विसर पडला आहे.

वर्षपूर्तीनंतरही निर्णय नाही : मृत कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचा शासनाला पडला विसर वडेगाव : अंशदायी पेन्शन योजना लागू असलेल्यांपैकी मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना पेन्शनचा लाभ देण्याच्या घोषणेचा शासनाला पूर्णत: विसर पडला आहे. याबाबतच्या घोषणेला वर्षपूर्ती झाली. तरीही याबाबत शासनाचे ‘तळ्यात-मळ्यात’ सुरू असल्याचे दिसत आहे. १ नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्याांना शासनाने १९८२ ची जुनी पेन्शन योजना नाकारुन अंशदायी या गोंडस नावाची वेठबिगारासारखी नवीन पेन्शन योजना लागू केली. सदर योजनेत अकाली मृत्यू पावणाऱ्या कर्मचाऱ्याच्या भविष्याची कुठलीही तरतूद केलेली नाही. शिवाय सदर पेन्शन योजना म्हणजे कर्मचाऱ्यांच्या हक्कावर गदा असल्याचे सांगत राज्यातील सुमारे दोन लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांनी आधी आॅक्टोबर २०१५ व नंतर मार्च २०१५ मध्ये अनुक्रमे नागपूर व मुंबई येथील विधीमंडळ अधिवेशन काळात धरणे आंदोलन केले होते. सदर आंदोलनाची दखल घेत राज्याचे वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी अंशदायी पेन्शनधारक मृत कर्मचाऱ्यास पेन्शनचे लाभ देण्याची घोषणा आंदोलकांपुढे केली होती. त्यानंतर अनेक दिवस कार्यवाही न झाल्याने कर्मचाऱ्यांनी सदर घोषणेचा पाठपुरावा केल्यामुळे शासनाने वेळकाढूपणाचे धोरण अवलंबित वित्तमंत्री, वित्त राज्यमंत्री व इतर सदस्याची समिती गठित केली. मात्र आज सदर घोषणेला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी शासन कुठलाही निर्णय घेण्यास कार्यतत्परता दाखवित नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. आधीच तुटपुंज्या मानधनावर काम करुन शासन सेवेत आलेले तरुण कर्मचारी हे त्यांचा कुटुंबाचा आधार होते. त्यांच्या अकाली निधनाने आजघडीला कुटुंबाची खूप मोठी हेळसांड होत असून उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण महाराष्ट्रात सद्यस्थितीत २ लाख ४७ हजार अंशदायी पेन्शनधारक कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी १९७ कर्मचारी विविध कारणांनी अकाली मृत पावलेले आहेत. सदर मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी दुसऱ्याची चाकरी करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. ९१ कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय रोजगार हमी योजनेच्या कामावर जात असल्याचे तर १७ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी रस्त्याकडेला हातठेला लावून उदरनिर्वाह करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची जर अशी अवदशा होत असेल तर सामान्य जनतेचे काम? असा प्रश्नही याठिकाणी उपस्थित केला जात आहे. दरम्यान चालू अधिवेशनादरम्यान शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास उपोषणावर बसण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने घेतला आहे. (वार्ताहर)