लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पाऊस कमी आल्याने धान पिकाच्या पेरण्यांसह रोवणीही उशीरा आटोपली. मात्र आॅगस्ट महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासून पावसाने हजेरी लावली व समाधानकारक पाऊस आला. यामध्ये कृषी विभागाने ठेवलेले धान पीक लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाले. पावसामुळे ऑगस्ट महिन्यात एका घराची पूर्णत: पडझड तर एक हजार घरांची अंशदायी तसेच १६१ गोठ्यांची पडझड झाली. पावसामुळे ग्रामीण भागातील घर व गोठ्यांना मोठा फटका बसला आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या सूचीनुसार ऑगस्ट महिन्यात गोरेगाव तालुक्यात एक घर पूर्णत: कोसळले असून अंशत: पडझड झालेल्या घरांमध्ये गोंदिया तालुक्यात ४५, तिरोडा तालुक्यात १६०, गोरेगाव तालुक्यात १५६, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात २१७, देवरी तालुक्यात ४२, आमगाव तालुक्यात १४२, सालेकसा तालुक्यात १०६ तर सडक-अर्जुनी तालुक्यात १३५ घरांचा समावेश आहे. शिवया, १६१ गोठ्यांची पडझड झाली असून यात गोंदिया तालुक्यात नुकसान नसून तिरोडा तालुक्यात २०, गोरेगाव तालुक्यात ५५, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात २०, देवरी तालुक्यात आठ, आमगाव तालुक्यात ३२, सालेकसा तालुक्यात २६ तर सडक-अर्जुनीही नुकसान नसल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे, आॅगस्ट महिन्यात जीवीत हानी झाली नाही. यापैकी ५१५ घर तर १०७ गोठे मदतीसाठी पात्र ठरले आहेत.
१२०० घरे व गोेठ्यांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 06:00 IST
प्रशासनाने जाहीर केलेल्या सूचीनुसार ऑगस्ट महिन्यात गोरेगाव तालुक्यात एक घर पूर्णत: कोसळले असून अंशत: पडझड झालेल्या घरांमध्ये गोंदिया तालुक्यात ४५, तिरोडा तालुक्यात १६०, गोरेगाव तालुक्यात १५६, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात २१७, देवरी तालुक्यात ४२, आमगाव तालुक्यात १४२, सालेकसा तालुक्यात १०६ तर सडक-अर्जुनी तालुक्यात १३५ घरांचा समावेश आहे.
१२०० घरे व गोेठ्यांची पडझड
ठळक मुद्देपावसाचा कहर : ५१५ घर व १०७ गोठे मदतीसाठी पात्र