शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:35 IST

गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार गोपालदास अग्रवाल व त्यांच्या कुटुंबीयासंदर्भात बदनामीकारक मजकूर फेसबुकवर टाकणाऱ्या व त्यावर कांमेन्टस करणाऱ्या दोघांवर शहर पोलिसांनी सोमवारी (दि.२) गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार गोपालदास अग्रवाल व त्यांच्या कुटुंबीयासंदर्भात बदनामीकारक मजकूर फेसबुकवर टाकणाऱ्या व त्यावर कांमेन्टस करणाऱ्या दोघांवर शहर पोलिसांनी सोमवारी (दि.२) गुन्हा दाखल केला आहे.आरोपी सम्मी विरेंद्रकुमार जायस्वाल फुलचूर नाका रोड गोंदिया व नगर परिषदेचे उपाध्यक्ष शिवकुमार शंकरलाल शर्मा रा. रामनगर यांनी आक्षेपार्ह मजकूर टाकून फेसबूकवर कांमेन्टस केले. त्यामुळे यासंदर्भात राकेश अंगतसिंग ठाकुर (४०) रा. गौशाला वार्ड गोंदिया यांच्या तक्रारीवरुन गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम २९४, ५००, ३४ सहकलम ६७ माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.या घटनेमुळे गोंदिया शहर पोलिसांनी सीआरपीसीअंतर्गत ४१ अ ची नोटीस सम्मी जायस्वाल व शिवकुमार शर्मा यांना पाठविली. चौकशीसाठी पोलिसांनी बोलाविल्यावर दिडशेच्यावर पोलीस ठाण्यात आलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आम्हाला अटक करा, चौकशी का करता अशी मागणी केली. चौकशी करायची आहे तर ज्या व्यक्तिच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर आहे. त्या व्यक्तिला आपत्ती आहे किंवा नाही यासंदर्भात चौकशी करणाऱ्या आमदार अग्रवाल यांचे बयाण घ्या. त्यानंतर आम्ही बयान देवू असे म्हणाले. ज्याच्या नावाने बदनामी झाली तो व्यक्ती तक्रार करीत नसून दुसरा व्यक्ती तक्रार करतो आणि पोलीस गुन्हे दाखल करतात. हे न्यायसंगत आहे का? जो व्यक्ती तक्रार करतो तो सट्टा चालवितो आणि त्याचा हप्ता शहर पोलिसांना जातो त्यामुळे त्या व्यक्तिची तक्रार पोलीस सहज घेतात. असा आरोप भाजप पदाधिकाºयांनी या वेळी केला.१७५ लोकांनी केली कॉमेन्ट्सआमदार गोपालदास अग्रवाल व त्यांच्या कुटुंबियासंदर्भात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यानंतर त्यावर १७५ लोकांनी कॉमेन्ट्स केली. त्या सर्वांवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. परंतु फक्त शिव शर्मा व सम्मी जायस्वाल या दोघांवरच गुन्हा दाखल करने ही बाब न पटण्यासारखी असल्याचे भाजप पदाधिकाºयांचे म्हणने होते.श्रेय लाटण्यावरुन घडले प्रकरणगोंदियातील गौशाळेला १ कोटी रुपये मिळाले. ते कुणामुळे मिळाले यावर गोंदियात जोरदार चर्चा सुरु आहे. या १ कोटी रुपयांचे श्रेय आमदार गोपालदास अग्रवाल, विधान परिषदेचे सदस्य डॉ. परिणय फुके हे दोघेही घेतात. या श्रेयासाठी भाजप कार्यकर्ते आमदार गोपालदास अग्रवाल यांना कुठलेही श्रेय लाटणारा व्यक्तीमत्व असल्याचे सांगत असल्यामुळे यातूनच झालेल्या फेसबुकवरील चर्चेत आक्षेपार्ह मजकूर असल्याचे बोलल्या जाते.