शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नैराश्यापोटी टोकाचे पाऊल, एकाच दिवशी चार जणांचा आत्महत्येचा प्रयत्न!

By नरेश रहिले | Updated: December 23, 2023 22:07 IST

आत्महत्या हा पर्याय नाही, संवादातून निघू शकतो मार्ग...

गोंदिया : मनात आलेल्या नैराश्यापोटी विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविण्याचा विचार आल्याने २२ डिसेंबर रोजी एकाच दिवशी गोंदिया जिल्ह्यातील चौघांनी विष प्राशन केल्याने त्यांना उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

सालेकसा येथील चांगुला राजकुमार राऊत (वय ५५) हिने अनोळखी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला २२ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दुसरी घटना गोंदिया शहराच्या ईसरका मार्केटच्या येवले चायजवळ घडली. अर्जुन तुलसीदास छुरा (४०, रा. यादव चौक, गोंदिया) याने उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला सायंकाळी ५:१० वाजता उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तिसरी घटना सालेकसा तालुक्याच्या भाडीपार येथील आहे. भाडीपार येथील १७ वर्षांच्या मुलीने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. तिला दुपारी १२ वाजता उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

चौथी घटना सडक-अर्जुनी तालुक्याच्या खडकी येथील आहे. तुलाराम रामलाल सलामे (३५) याने स्वत:च्या घरीच उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याचा प्रथमोपचार सडक-अर्जुनीच्या ग्रामीण रुग्णालयात केल्यानंतर पुढील उपचारासाठी सायंकाळी सात वाजता गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्या चौघांवर उपचार सुरू असून या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी केली आहे.तरुणांनो, टोकाचे निर्णय घेऊ नकाकुठल्याही समस्या अथवा अडचणीवर संवादातून मार्ग काढता येतो. त्यासाठी थेट आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेणे चुकीचे आहे. नैराश्य हे काही वेळेपुरते असते. आपले कुटुंब व मित्र परिवाराशी संवाद साधा, त्यांच्याजवळ व्यक्त व्हा; नक्कीच यातून मार्ग निघेल. नैराश्यातून बाहेर पडता येईल.- डॉ. लोकेश चिरवतकर, मानसिक रोग तज्ज्ञ 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर