शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
5
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
6
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
7
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
8
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
9
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
10
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
11
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
12
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
13
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
14
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
15
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
16
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
18
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
19
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
20
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका

डाक विभागाची कसरत : भारतीय संस्कृतीचे घडतेय दर्शन

By admin | Updated: August 17, 2016 00:07 IST

बहिण-भावाच्या पवित्र नात्यातील प्रेमाचे प्रतिक म्हणून रक्षाबंधन या सणाला आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे.

गोंदिया : बहिण-भावाच्या पवित्र नात्यातील प्रेमाचे प्रतिक म्हणून रक्षाबंधन या सणाला आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच चिमुकल्या मुलींपासून सर्व महिलांना सध्या रक्षबंधनाचे वेध लागले आहेत. अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या या सणासाठी आवडीची राखी खरेदी करण्यासाठी मंगळवारी गोंदियाच्या मार्केटमध्ये महिलावर्गाची एकच गर्दी दिसून आली. अडचणीत किंवा संकटात भावाने बहिणीचे संरक्षण करण्याचे वचन म्हणून हा राखीचा धागा बांधला जात असला तरी केवळ एवढाच हेतू या रक्षाबंधनाचा नाही तर बहिण-भावाचे नाते आयुष्यभर एका प्रेमाच्या सूत्रात बांधले असावे, हा त्यामागील उद्देश्य असतो. पाश्चात्य संस्कृतीत रक्षाबंधनासारखे सण नाहीत. त्यामुळे तेथे बहिण-भावंडांमध्ये आपुलकी, आत्मियता, स्रेहभाव दिसून येत नाही. मात्र भारतीय संस्कृतीच्या वैशिष्ट्यांपैकी एक महत्वाचे वैशिष्ट म्हणजे रक्षाबंधन आहे. हा बंध केवळ धाग्याचा नसून बहिण-भावाच्या प्रेमाच्या नात्याचा असतो. वर्षभरातून केवळ एकदाच नारळी पौर्णिमेच्या दिवशी येणाऱ्या या सणाची प्रत्येक भारतीय भाऊ-बहिण उत्सुकतेने वाट पाहत असतात. या दिवशी मी आपल्या भावाला त्याच्याजवळ नसलेली एखादी वस्तू भेट देईन व माझ्या बहिणीला आवडणारी एखादी वस्तू भेट देईन, अशी आशा ते बाळगून असतात. बहिण भावाच्या नात्यातील ही ओढ केवळ आपल्या भारतीय संस्कृतीतच आढळते. त्यामुळेच महिलावर्गासोबत बहिणीला तिच्या आवडीचे गिफ्ट देण्यासाठी भाऊरायांचीही मार्केटमध्ये वर्दळ दिसून येत आहे. शहरातील बाजारपेठ राख्यांच्या दुकानांनी सजली आहे. विविध प्रकारचे रंगीबिरंगी व रक्षासूत्र विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहेत. आपल्या आवडीची रक्षासूत्रे पसंत करून महिला ती खरेदी करीत आहेत. पाच रूपयांपासून ते ५० रूपयांपर्यंत या रक्षासूत्रांचे दर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे. शिवाय ५० रूपये डझन व १०० रूपये डझन याप्रमाणेसुद्धा राख्या विकल्या जात आहेत. परगावी राहणाऱ्या भावांना राख्या पाठविण्यासाठी लिफाफ्यांची विक्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्रामीण भागात इतर सुविधा नसल्याने राख्या पोहोचविण्याच्या कामात डाकविभागाची मोठीच दमछाक होत आहे. डाक कार्यालयातही राख्यांनी भरलेल्या लिफाफ्यांची छाननी करण्यात डाक कर्मचारी व्यस्त असल्याचे चित्र दिसून येते. राखी विक्रीच्या दुकानांसह फळ व मिठाईच्या दुकानांवरही महिला व मुलींची गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत फळांचे दरसुद्धा आकाशाला भिडले आहेत. कपडे व दागिण्यांच्या दुकानांवरही भावंडांची गर्दी आढळून येत आहे. ते आपल्या बहिणीला कपडे किंवा दागिणे भेट देण्यासाठी विविध दुकानांमध्ये चकरा मारताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे आधुनिक काळात अनेक सण कालबाह्य होताना दिसतात. मात्र रक्षाबंधन या सणाचे महत्त्व दरवर्षी वाढतच जात असल्याचे दिसते.(प्रतिनिधी)