शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 23:39 IST

सरसकट कर्जमाफी व उन्हाळी धान पिकाला ५०० रूपये बोनस द्यावा यासह १४ मागण्यांना घेऊन राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने येथील तहसील कार्यालयासमोर शनिवारी (दि.१) धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.

ठळक मुद्देसंडे अँकर । राष्ट्रवादी कॉँग्रेसची मागणी : तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : सरसकट कर्जमाफी व उन्हाळी धान पिकाला ५०० रूपये बोनस द्यावा यासह १४ मागण्यांना घेऊन राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने येथील तहसील कार्यालयासमोर शनिवारी (दि.१) धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आलेल्या धरणे आंदोलनांतर्गत सरसकट कर्जमाफी व उन्हाळी धान पिकाला ५०० रूपये बोनस या दोन मुख्य मागण्यांसह १४ मागण्या प्रामुख्याने मांडण्यात आल्या. आपल्या मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. अविनाश काशीवार, गजानन परशुरामकर, रुपविलास कुरसुंगे, प्रदेश सचिव मनोहर चंद्रीकापुरे, जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, रमेश चुºहे, रजनी गिºहेपुंजे, शिवाजी गहाणे, छाया मरस्कोल्हे, आर.बी.वाढई, सुभाष उईके, विनोद बागरे, दिलीप गणविर, वासुदेव मेश्राम, भोजराज भंडारी, संतोष शेंडे, शश्किला टेंभुर्णे, प्रल्हाद उईके, शाकीर खा, जहीर अहमद, राहुल येल्ले, रोहीत झाडे, रोहीत राऊत यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.या आहेत प्रमुख मागण्याउन्हाळी धानपिकाला ५०० रुपये बोनस देणे, सरसकट कर्ज माफ करणे, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरु करणे, शासनाच्या १८ आॅगस्ट २०१८ च्या शासन निर्णयातील ग्रामपंचायतचे रोहयो पाच लक्ष मर्यादा रद्द करुन २५ लक्ष रुपये करणे, ग्रा.पं. कुशल कामाचे तातडीने पेमेंट करणे, शेतीसाठी कृषी पंपाचे वीज बिल माफ करणे, कृषी पंपांसाठी नवीन वीज कनेक्शन देणे, पंतप्रधान पिकविमा योजनेचे तातडीने क्लेम मंजुर करणे, तालुक्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करणे, विजेचे घरगुती वीज शुल्क माफ करणे, मच्छीमार तलावाची लिज माफ करणे, उमरझरी-चुलबंद-रंगेपार मध्यम प्रकल्पातील साचलेला गाळ काढणे आणि कालव्यांची दुरुस्ती करणे, सडक-अर्जुनी तालुक्यात एमआयडीसीची स्थापना करुन लघु उद्योगांना प्रोत्साहन देणे तसेच रासायनिक खतांचे वाढलेले भाव कमी करणे या मागण्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज