शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

सांस्कृतिक मेजवानीसाठी ग्रामीण भागात उत्साह

By admin | Updated: November 10, 2016 00:40 IST

जवळच्या दक्षिण दिशेला असणाऱ्या येरंडी येथे फ्रेन्डस नाट्यकला मंडळाच्या सौजन्याने मंडई उत्सवा दरम्यान

मंडई व नाट्यप्रयोग : नातेवाईकांचे स्नेहमीलन बाराभाटी/इटखेडा : जवळच्या दक्षिण दिशेला असणाऱ्या येरंडी येथे फ्रेन्डस नाट्यकला मंडळाच्या सौजन्याने मंडई उत्सवा दरम्यान लाडका नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी सहायक पोलीस अधीक्षक मंदार जवळे यांच्या हस्ते उद््घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी खंडविकास अधिकारी नारायण जमईवार, प्रमुख पाहुणे सुखदेव दहिवले, कार्यकारी अभियंता सा.बा.हेमंत गाणार, सोनडवले, जेसा मोटवानी, रत्नदीप दहिवले, जि.प.सदस्य गिरीष पालीवाल, रमेश डोंगरे, नायब तहसीलदार मुनेश्वर गेडाम, पोलीस निरीक्षक चव्हाण, दिलवर रामटेके, लुणकरण चितलांगे, भोजराज चांडक, अनिल जैन, पौर्णिमा शहारे, लिलाधर ताराम, पोलीस पाटील खेमराज गेडाम, परसराम माने उपस्थित राहणार आहेत. अनेक वर्षापासून सदर मंडळ मंडई उत्सव व नाट्यप्रयोग सादर करतो, यवा रंगमंच लाडका प्रयोग सादर करणार आहे. हा प्रयोग २० नोव्हेंबरला सार्वजनिक रंगमंच या ठिकाणी दाखविण्यात येईल. याठिकाणी संपूर्ण विदर्भ व झाडीपट्टीमधील रसिक वर्ग नाट्यप्रयोग पाहायला येतो. पाहुणचारही होतो. मंडई उत्सव व नाट्यप्रयोग यशस्वी करण्यासाठी अनिल दहिवले, वासुदेव तागडे, किसन बोरकर, कुंजीलाल रामटेके, बालकदास बोरकर, गोविंदराव बोरकर, पितांबर वाघाडे, नंदकुमार खोब्रागडे, सुधाकर तागडे, भारत गेडाम, सम्राट नेवार, अमृत पंधरे सहकार्य करीत आहेत. मनोरंजनासाठी नाटक व कव्वालीची मेजवानी इटखेडा : अर्जुनी-मोरगाव तालुक्यामध्ये प्रसिध्द असलेली इटखेडा येथे मंडई उत्सव ११ नोव्हेंबर रोजी शुक्रवारला आयोजित केला आहे. दिवाळी सणानंतर या परिसरातील जनमानसांना इटखेडा येथे भरणाऱ्या मंडई उत्सवाची मोठी प्रतिक्षा असते. या उत्सवाच्या निमित्ताने दिवाळी सणाला येऊ न शकणारी पाहुणे मंडळील नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने दूरवरून येतात. भेटीगाठीच्या माध्यमातून एकमेकाबद्दलचा जिव्हाळा, क्षेमकुशल जाणून घेण्याची तीव्र इच्छा, सोयरीक जुळविण्यासाठी प्रत्यक्ष बोलणी, मानसन्मान, गेल्या उन्हाळ्यात लग्न होऊन सासरी आलेल्या मुलींची माहेरची माणसे येण्याची तीव्र ओढ इत्यादी सर्व बाबींचा योग घडून येणारा हा मंडई उत्सव या निमित्याने इटखेडा येथे वर्षभरातील मोठा बाजार भरतो. जीवनावश्यक वस्तूपासून गृहीणी व लहान मुलांना आकर्षण होतील अश्या वस्तू विक्रीला येतात. कोणत्या न कोणत्या कारणाने स्वमर्जीने व स्वहस्ते खरेदी करता येईल अश्या वस्तू जिन्नस महिला वर्ग मंडईत फेरफटका मारून खरेदी करतात. झुले, पाळणे, खेळण्या, मिठाई याबाबतचा बच्चे कंपनीचा आनंद अवर्णनीय असतो. स्थानिक व इतर गावावरून येणाऱ्या दंडार नृत्याचे आकर्षण हे देखील मंडईचे वैशिष्टच असते. या दंडार नृत्याचा माध्यमातून लोककला पाहण्याचा योग नागरिकांना व पाहुण्यांना या निमित्ताने येतो. मंडई उत्सवाच्या निमित्ताने पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी ओम साई सांस्कृतिक कला मंडळ इटखेडाच्या सौजन्याने युवा रंगमंच वडसा लाडका हे कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाटक व या दरम्यान सुशिलकुमार प्रस्तुत नटरंग डान्स अ‍ॅड लावणी आणि युवा शक्ती बहुउद्देशिय ग्रामीण विकास मंडळ यांच्या सौजन्याने करिष्मा ताज, कानपूर व राहुल शिंदे, पुणे यांचा दुय्यम कव्वालीचा मुकाबला रंगणार आहे. रसिकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. (वार्ताहर)