शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

चांगला रस्ता खोदून नवीन डांबरीकरण

By admin | Updated: May 4, 2015 01:50 IST

श्री चक्रधर स्वामीच्या पावनभूमीमध्ये चांगल्या डांबरीकरण रस्त्याला खोदुन त्याच्यावर नवीन खडीकरण करुन डांबरीकरण करण्यात आले.

सुकडी (डाकराम) : श्री चक्रधर स्वामीच्या पावनभूमीमध्ये चांगल्या डांबरीकरण रस्त्याला खोदुन त्याच्यावर नवीन खडीकरण करुन डांबरीकरण करण्यात आले. खडीकरण रस्ता बांधकाम करीत असताना निकृष्ट साहित्याची गिट्टी व ओर साईजच्या गिट्टीचा वापर करुन डांबरीकरण करण्यात आले. डांबरीकरण करीत असताना साहित्य हे निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आल्याचे निदर्शनास आले असून या रस्त्याची चौकशी करुन कंत्राटदार व संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.श्री चक्रधर स्वामींच्या पावनभूमीत सुकडी-डाकराम ते प्राथमिक आरोग्य केंद्र व्हाया ठाणेगाव या डांबरीकरण रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. ते खड्डे संबंधित विभागाने कधी डांबरीकरणाने दुरुस्त केले नाही. रस्त्याचे डांबरीकरण होवून कमीत कमी दोन ते तीन वर्षे लोटले. त्यावेळी जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष दिले असते तर दोन-तीन वर्षांतच डांबरीकरण उखडला नसते. या रस्त्यावरून फक्त मोटार सायकल, जिप गाडी व सायकल जातात. जड वाहन या रस्त्याने जात नसतानाही रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. ‘लोकमत’ने याबाबत बातम्या प्रकाशित करून या रस्त्याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर तात्काळ सुकडी-डाकराम- प्राथमिक आरोग्य केंद्र-ठाणेगाव या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन दिला.सदर रस्त्याचे डांबरीकरण होतेच. काही ठिकाणी खड्डे पडले होते. पण या डांबरीकरण रस्त्याचे खड्डे डांबरीकरणाने दुरुस्ती करुन त्यावर नवीन डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होती. पण अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार साटेलोटे करून शासनाच्या निधीचा कसा दुरुपयोग करतात, हे यावरुन दिसून येते. सदर रस्त्याचे थातुरमातूर खडीकरण फक्त ५६० मीटर करण्यात आले. ५०० मीटर डांबरीकरण रस्ता खोदण्यात आला. त्यावर खडीकरण करुन मुरुमाची पिसाई करण्यात आली. त्यानंतर पुन्हा गिट्टी टाकून त्याच्यावर डांबराचा फवारा घालून चुरी टाकण्यात आली. त्यानंतर साध्या मिक्चर मशीनद्वारे डांबरीकरण करण्यात आले. हे होत असताना या मार्गाने अधिकारी, कर्मचारी, आमदार व जि.प.चे उपाध्यक्ष, पं.स.चे उपसभापती व पदाधिकारी गेले. पण या डांबरीकरण रस्त्याच्या कामाचा दर्जा पाहण्याची हिंमत कोणीही दाखविली नाही. ‘चोर-चोर मावस भाऊ’ असा हा प्रकार आहे. सदर डांबरीकरण रस्त्याचे खडीकरण करण्यात आलेली गिट्टी ही बरोबर आकाराची आहे. पण त्यानंतर दुसरा कोट करण्यात आला. त्यामध्ये ४० एमएम साईजच्या काळ्या रंगाच्या गिट्टीचा वापर करणे गरजेचे होते. पण संबंधित कंत्राटदार यांनी ८० एमएमच्या गिट्टीचा वापर करुन रस्त्यावर दुसरा कोट चढविला. त्यानंतर बारीक चुरीचे मिक्सर मशिनद्वारे डांबरीकरण करण्यात आले. यामध्ये पुन्हा बदरीचा एक कोट करण्यात आले नाही. विशेष म्हणजे केवळ ५०० मीटर रस्त्याचे खडीकरण-डांबरीकरण करण्यासाठी १० लाखांचा निधी मजूर करण्यात आला होता, असे संबंधित कनिष्ठ अभियंता निमकर यांनी सांगितले. पण या डांबरीकरण रस्त्यावर पडलेले खड्डे बुझवून त्यांवर डांबरीकरणाचा पूर्ण कोट करण्यात आला असता तर १० लाखामध्ये सुकडी-डाकराम ते व्हाया प्राथमिक आरोग्य केंद्र ठाणेगाव मार्ग १.५ किमीच्या रस्त्यावर डांबरीकरण होवू शकले असते. पण तसेच न करता अधिकारी व कर्मचारी यांनी फक्त ५०० मीटरपर्यंत रस्त्याचे खडीकरण- डांबरीकरण करण्याचे निश्चित करुन १० लाख रुपयांच्या निधीचा दुरुपयोग केला. (वार्ताहर)