शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या पिकातून खोदकाम सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2022 05:00 IST

शुक्रवारी (दि.१८) धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे अधिकारी पोलीस बंदोबस्तात गावात धडकले व त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र असल्याचे सांगत शेतातून पाईपलाईनसाठी खोदकामाला सुरुवात केली. यावर गावकरी व शेतकऱ्यांनी विरोध केला. एवढेच नव्हे तर माजी आमदार दिलीप बंसोड यांनीही शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पण संबंधित अभियंत्यांनी काहीच ऐकून न घेता खोदकामाला सुरुवात केली.

लोकमत न्यूज नेटवर्कसुकडी-डाकराम :  धापेवाडा उपसा सिंचन विभाग टप्पा-२ अंतर्गत बोदलकसा जलाशयात पाणी टाकण्यासाठी पाईपलाईनच्या खोदकामाला अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.१८) पोलीस बंदोबस्तात सुरुवात केली. जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र असल्याचे सांगत कामाला सुरुवात करण्यात आली असून, पत्राची फक्त अफवाच असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे मात्र पाईपलाईनसाठी मोहरीच्या उभ्या पिकातून खोदकाम केले जात आहे. असे असतानाही शेतकऱ्यांच्या मदतीला कोणताही नेता धावून आला नाही. शुक्रवारी (दि.१८) धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे अधिकारी पोलीस बंदोबस्तात गावात धडकले व त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र असल्याचे सांगत शेतातून पाईपलाईनसाठी खोदकामाला सुरुवात केली. यावर गावकरी व शेतकऱ्यांनी विरोध केला. एवढेच नव्हे तर माजी आमदार दिलीप बंसोड यांनीही शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पण संबंधित अभियंत्यांनी काहीच ऐकून न घेता खोदकामाला सुरुवात केली. जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र असल्याचे अधिकारी सांगत असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयातून असे कोणतेच पत्र संबंधित विभागाला आले नसून, फक्त ती अफवा होती, असे दिसत आहे. शेतातून खोदकामासाठी शेतकऱ्यांचा विरोध असल्याने उपविभागीय अधिकारीसुद्धा सुकडी-डाकराम येथे येऊन मोकापाहणी  करून गेले होते. हे प्रकरण उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयात असतानाच संधीचा फायदा घेऊन धापेवाडा उपसा सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र असल्याचे सांगून शेतातून खोदकाम सुरू केले. यानंतर शुक्रवारी  येथे पोलीस उपविभागीय अधिकारी प्रमोद मडामे व पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्यासह १०० च्यावर पोलीस कर्मचारी होते. यातूनच रात्रीलासुद्धा पोलीस बंदोबस्तात पाईपलाईनचे खोदकाम सुरू होते.  

शेतकऱ्यांच्या मदतीला कुणीही फिरकला नाही

- या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना समस्यांचे निराकरण करण्यासाठी फक्त माजी आमदार दिलीप बन्सोड आले होते. त्यानंतर जिल्ह्यातील कुणीच आमदार, खासदार, मंत्री व नेता फिरकलाच नाही. या शेतकऱ्यांना नेत्यांनी वाऱ्यावर सोडले आहे. पाईपलाईनचे खोदकाम मोहरीच्या उभ्या पिकावर सुरू असून अधिकाऱ्यांनी उभ्या पिकांचीही गय केली नाही. अधिकाऱ्यांची जबान बदलली- धापेवाडा उपसा सिंचनचे कार्यकारी अभियंता अंकुर कापसे यांना विचारले शुक्रवारी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र आहे असे शेतकऱ्यांना सांगितले होते. पण कापसे यांना शनिवारी विचारले असता त्यांनी, हे आमच्या विभागाचे काम आहे येथे जिल्हाधिकारी कार्यालयाचा कुठेच संबंध येत नाही व तसे पत्रसुद्धा नाही. फक्त पोलीस प्रशासनाचे पत्र असल्याचे सांगितले. एकंदर जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राचा धाक दाखवून खोदकामाला सुरुवात करण्यात आली असल्याचे दिसून येत आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प