शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

माजी सभापती कटरेंवर २७ लाखांची वसुली

By admin | Updated: October 28, 2016 01:19 IST

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सन २०१२-१३ व २०१३-१४ मध्ये आर्थिक व्यवहारात अतिजास्त खर्च करण्यात आला

नोटीस जारी : मंजूर तरतुदीपेक्षा जास्त खर्च केल्याचा आरोप तिरोडा : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सन २०१२-१३ व २०१३-१४ मध्ये आर्थिक व्यवहारात अतिजास्त खर्च करण्यात आला असल्याचा आरोप करीत समितीचे मुख्य प्रशासक व सचिव यांनी माजी सभापती वाय.टी.कटरे यांना २७ लाख ५५ हजार ४०९ रुपये वसुलीसाठी नोटीस जारी केली आहे. प्राप्त माहितीनुसार, संदर्भीय पत्रानुसार जिल्हा उपनिबंधक सह. संस्था गोंदिया यांचे कार्यालयीन आदेश क्रमांक जिऊनि/नियम/कलम-४० / २०१४-१५ दि.८.५.२०१४, आर.एल.वाघे प्रधिकृत चौकशी अधिकारी यांचे दि.८.१०.१४ चे चौकशी अहवाल, सन २०१२-१३, २०१३-१४ चे लेखा परीक्षा अहवाल दि. ३०.३.२०१५ ला प्राप्त या संदर्भीय पत्रानुसार माजी सभापती व सचिव यांनी गैरव्यवहार व अति महत्वाचे आर्थिक दोष अहवालाा व लेखापरीक्षण अहवालात नमुद आहेत. त्यानुसार मुळ अर्थसंकल्पात मंजूर तरतुदीपेक्षा जास्त नियमबाह्य खर्च झालेल्या आहे. तो पुढीलप्रमाणे मंजूर तरतुदीपेक्षा जास्त खर्च १६०२६३७, बांधकामाकरीता घेतलेली अग्रीम उचल ५५००००, सभापती गाडी भाडा व डिझेल खर्च वैयक्तिकपणे केलेला खर्च ३६८६७२, समायोजीत करून काढलेले बील २०९१०००, असे एकूण २७३०४०९ रुपये व वैयक्तिक खतावणीप्रमाणे २५००० रुपये असे एकूण २७,५५,४०९ रुपये समितीचे रेकार्डवरून सदर राशी वसूल पात्र असल्याचे नोटीसामध्ये नमूद केले आहे. ेवरील आरोप वाय.टी.कटरे यांचेवर करण्यात आले असून याबाबत आपले काही म्हणणे असल्यास लेख खुलासा करण्यात यावा. या काळात दस्तऐवज पाहण्यासाठी समितीत उपलब्ध असल्याचेही नोटीसात नमूद केले आहे. खुलासा विहीत मुदतीत सादर न झाल्यास याबाबत आपले काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरून पुढील कायदेशीर कार्यवाही प्रस्थापित करण्यात येईल, असे नमूद केले आहे. वरील नोटीस दि.४.१०.१६ ला दिल असून दुसरे नोटीस १८.१०.२०१६ ला सुध्दा देण्यात आले. नोटीस-२ मध्ये नमुद केले की आपल्या पत्राचे अवलोकन केले असता आपला खुलासा समाधानकारक नाही. त्यामुळे ही नोटीस मिळताच समितीमध्ये २७५५४०९ रु. तत्काळ १५ दिवसाच्या आत भरणा करावा न केल्यास कायदेशीर कार्यवाही होईल.- समितीने लावलेले आरोप निराधार-कटरे समितीने लावलेल्या आरोपांबाबत माजी सभापती वाय.टी.कटरे यांना विचारले असता ते म्हणाले, २७.१२.२०१३ ला मी तिरूपती बालाजीकडे संचालकांसह निघालो असता हैद्राबादजवळ अपघात झाला. त्यात पाच महिने मी दवाखान्यात राहीलो. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने सभापतीपदाचा राजीनामा दिला. २८.१२.२०१३ नंतर झालेल्या भ्रष्टाचारास मी जवाबदार नाही. २५ हजार रुपये प्रवास अग्रीम बाबत कोणत्याही प्रकारचे प्रवास भत्ता देयके व इतर खर्च जमा करू शकलो नाही. भरायचे झाल्यास ही रक्कम भरण्यास तयार राहील किंवा बिल जमा करेल, असे ते म्हणाले. बाकीचे आरोप निराधार असल्याचे ते म्हणाले.