शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

विकासात प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा

By admin | Updated: May 2, 2017 00:27 IST

जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून पीक पध्दतीत बदल करावा.

पालकमंत्री बडोले यांचे प्रतिपादन : उत्कृष्ट कार्य करणारे व्यक्ती सन्मानितगोंदिया : जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून पीक पध्दतीत बदल करावा. शेवटच्या माणसाला आरोग्याच्या दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी किटबध्द आहोत. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.१ मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५७ व्या वर्धापन दिनाच्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात पोलीस मुख्यालय मैदान कारंजा येथे आयोजित ध्वजारोहाणाप्रसंगी करण्यात आले.यावेळी जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, आ.गोपालदास अग्रवाल, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी.कटरे, उपवनसंरक्षक युवराज, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदिप पखाले उपस्थित होते.पालकमंत्री पुढे म्हणाले, जिल्ह्यात जैवविविधता विपुल प्रमाणात आहे. जिल्ह्यात पर्यटनासोबत छोट्या-मोठ्या उद्योगातून जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी आपण प्रयत्नशील आहोत. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचा लाभ ६ हजार विद्यार्थीनींना दिला. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या वस्तीच्या विकासासाठी ११ कोटी ७० लाख निधी दिला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील चार तीर्थस्थळांचा विकास करण्यात येईल, रोहयो अंतर्गत १ लाख २० हजार कुटुंबांना रोजगार दिला आहे. बेरोजगार तरुण-तरुणींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देवून त्यांना स्वावलंबी करण्यात येत आहे. बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी आदिवासी भागात भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम अमृत आहार योजनेचा लाभ ४५४ अंगणवाड्यातील २१ हजार ९९४ लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. इंधनासाठी वनावरील अवलंबीत्व कमी करून पाच वर्षात जवळपास १४ हजार २५० कटुंबांना गॅस सिलींडरचा पुरवठा करण्यात आला. कटंगीकला व कलपाथरी प्रकल्प जून २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. बेवारटोला व ओवारा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. मामा तलावाचे खोलीकरण करणे, नविन २ हजार विहिरींचे शेतकऱ्यांना वाटप करणे, धापेवाडा उपसा सिंचन योजना लवकर पूर्ण करण्यासाठी आपला प्रयत्न आहे. मुद्रा बँक योजनेचा लाभ बेरोजगारांनी घेण्याचे आवाहन केले.यावेळी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता सोनाली चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, राजेश बागडे, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.इंगळे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके, अप्पर तहसिलदार के.डी.मेश्राम, लेखा अधिकारी बावीसकर व विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी पोलीस कमांडर, दंगा नियंत्रण पथक, होमगार्ड, जिल्हा वाहतूक शाखा, बँड पथक, बिट मार्शल, निर्भया पथक, श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक, फिरते न्यायवैद्यक पथक, शीघ्र कृती दल, रु ग्णवाहिका पथक व अग्नीशमन पथक यांनी पथसंचलन केले. संचालन शिक्षिका मंजूश्री देशपांडे यांनी केले. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.सन २०१६-१७ या वर्षात इडिट मोड्यूल, सात-बारा संगणकीकरणाचे उत्कृष्ट कामिगरी केल्याबद्दल गोरेगाव तहसिलदार कल्याणकुमार डहाट, तिरोडा तहसिलदार रविंद्र चव्हाण, सालेकसा तहसिलदार प्रशांत सांगळे तसेच तलाठी शैलेंद्र अंबादे, सुनिल राठोड, विनोद राऊत, एस.बी.मेश्राम, सी.एन.सोनवाने, पी.आर.गजबे, आर.एस.राऊत, मोतीराम पारधी, निखिलेश दंडाळे, विजय तांदळे, आशा हरमकर, जी. बी. हटवार, एम. टी.मल्लेवार, गौरीशंकर गाढवे, अशोक बघेले, ओमेश्वरी येळे, हस्तरेखा बोरकर, उत्कृष्ट संचालन करणाऱ्या शिक्षिका मंजूश्री देशपांडे, आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ््या अनेक कार्यक्रमात उत्कृष्ठ सहभाग नोंदविल्याबद्दल शहीद मिश्रा विद्यालय तिरोडाचे क्रीडा शिक्षक सुनिल शेंडे यांचा सन्मानपत्र व गौरवचिन्ह देवून पालकमंत्र्यांनी सत्कार केला.(तालुका प्रतिनिधी)भुजबळ यांना पोलीस महासंचालकाचे पदकपोलीस विभागात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आला. पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र गोंदियाचे पोलीस अधीक्षक दिलीप पाटील-भुजबळ यांना गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल, गोरेगावचे पोलीस निरिक्षक सुरेश कमद, पंकज पांडे, राजेंद्र सोलंकी, रेखलाल गौतम, दिक्षीतकुमार दमाहे, पंकज दिक्षीत या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले. नक्षलविरोधी अभियानात उत्कृष्ट कामिगरी केलेल्या पोलीस निरिक्षक राजकुमार केंद्रे, पोलीस उपनिरिक्षक ए.एच.शेख, राजेंद्र भेंडारकर, रिना चव्हाण, ओमप्रकाश जामनीक, रेखा धुर्वे, तीर्थराज बसेने, सुदर्शन वासनिक, गुप्त वार्ता विभागाचे राजा भिवगडे, रोजगार हमी योजना व कॅशलेस गोंदिया यामध्ये उत्कृष्ट कामिगरी करणारे उपजिल्हाधिकारी आर. टी. शिंदे, आदर्श तलाठी म्हणून आर.एच.मेश्राम,स्मार्ट गावचा पुरस्कार कोकणा या ग्रामपंचायतीला देण्यात आला. सरपंच लता चांदेवार, उपसरपंच शिवाजी गहाणे, ग्रामपंचायतचे सदस्य व ग्रामसेविका एस.बी.राऊत यांनी सदर पुरस्कार स्वीकारला.क्र ीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामिगरी बद्दल महेंद्र हेमणे, संजय नागपुरे, वल्लभ शेंडे व भारती बडगे. निलम अवस्थी, प्रियंका बैस, शिक्षीका प्राजक्ता रणदिव, सुनिल श्रीवास्तव, मुख्याध्यापक मधुकर नागपुरे, अजय पांडे, जी.व्ही.एस.प्रसाद यांचा सत्कार करण्यात आला.