शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकाने देशसेवेसाठी कार्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 22:30 IST

देशासाठी आपली स्वत:ची काय जबाबदारी आहे हे आपण ओळखले पाहिजे. देशसेवेसाठी ज्या सैनिकांनी बलिदान दिले ते वाया जाणार नाही. भारतीय सैन्य दल कुठेही मागे नाही.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : जिल्हाधिकारी कार्यालयात शौर्य दिन साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देशासाठी आपली स्वत:ची काय जबाबदारी आहे हे आपण ओळखले पाहिजे. देशसेवेसाठी ज्या सैनिकांनी बलिदान दिले ते वाया जाणार नाही. भारतीय सैन्य दल कुठेही मागे नाही. आपले सैनिक सीमेवर देशाची सुरक्षा करतात, त्यामुळेच आपण सुरक्षीत आहोत. त्यामुळे प्रत्येकाने देशसेवेसाठी कुशल कार्य करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह शनिवारी (दि.२९) आयोजित शौर्य दिन कार्यक्र मात त्या अध्यक्षस्थानावरु न बोलत होत्या. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी ए.के.सवई, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुनील कोरडे, निवासी उपजिल्हाधिकारी हरीश धार्मिक, पोलीस उपअधीक्षक (गृह) सोनाली कदम प्रामुख्याने उपस्थित होत्या. पुढे बोलताना डॉ.बलकवडे यांनी, २९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान हद्दीत शिरून सर्जीकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगीरी राज्यातील जनतेपर्यंत व्यापक प्रमाणात पोहोचिवण्यासाठी व माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २९ सप्टेंबर हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो असे त्यांनी सांगितले.सवई यांनी, आपले सैनिक हे कोणत्याही अडचणींची पर्वा न करता आपली कर्तव्ये चोखपणे बजावतात. सैनिकांच्या वर्दीमध्ये ताकद असते. सैनिक कधीही देशसेवेसाठी तत्पर असतात. सैनिकांमध्ये शिस्त असते असे त्यांनी सांगितले. धार्मिक यांनी, परकीय शक्तींपासून देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी आपला सैनिक सदैव तत्पर असतो.त्यामुळेच आपण सर्वजन सुरक्षीत आहोत. देशासाठी आपण कुशल कार्य केले पाहिजे. प्रत्येक नागरिकांनी स्वच्छता ठेवायला हवी. कधी कोणी कुठेही थुंकू नये. योग्य शिस्त ठेवून आपण देशासाठी आपले योगदान दिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांच्या हस्ते वीरपत्नी राजश्री क्षीरसागर यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्र मास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, लेखाधिकारी एल.एच.बाविस्कर, सहायक अधीक्षक आर.एच.पटले, मनोहरभाई पटेल सैनिकी शाळेचे कैलाश जांगळे यांच्यासह फुलचूर हायस्कूल विद्यार्थी, मनोहरभाई पटेल सैनिकी शाळेचे विद्यार्थी, माजी सैनिकांच्या विधवा व माजी सैनिक बहुसंख्येने उपस्थित होते. संचालन करु न प्रास्ताविक कल्याण संघटक धनराज बावनथडे यांनी मांडले. आभार कल्याण संघटक जगदिश रंगारी यांनी मानले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSoldierसैनिक