लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांत वाढ होत चालली आहे. महिला व बालकांवरील अत्याचार देखील वाढले आहेत. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रत्येकाने दक्ष राहणे गरजेचे असून तसेच सायबर सुरक्षिततेबाबत देखील प्रत्येकाने जागरु क रहावे असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे यांनी केले.जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने पोलीस मुख्यालयाच्या प्रेरणा सभागृहात शुक्रवारी (दि.३) ‘सायबर सेफ वूमन’ मोहिमेंंतर्गत आयोजित महिला-बालकांवरील अत्याचार व सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक राहूल शिरे, नगरसेविका अॅड. हेमलता पतेह, संगीता घोष, पूजा तिवारी, प्रमिला सिंद्रामे, नगर परिषदेच्या माजी सभापती भावना कदम, अपुर्व मेठी, गजेंद्र फुंडे व असाटी प्रामुख्याने उपस्थित होते.प्रारंभी ‘सायबर साक्षरता ही काळाची गरज आहे’ याबाबत व्हिडिओ क्लीप दाखिवण्यात आली. शिरे यांनी, महिला व बालकांबाबतचे गुन्हे, लैंगिक अत्याचार आणि फसवणूक यासाठी सर्रास इंटरनेटचा वापर होत असल्यामुळे त्यावर आपण काय उपाय केले पाहिजे याबाबत पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे विस्तृत माहिती दिली. अॅड. पतेह यांनी, इंटरनेट किंवा मोबाईल हाताळताना सावध राहण्याची गरज आहे. मुलांना लहान वयातच चांगले संस्कार दिले पाहिजे. गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी महिला व बालकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे असे सांगितले. घोष यांनी, सायबर गुन्हे कमी करण्यासाठी पोलीस विभागातील सायबर सेलची मदत घेण्यात यावी. मोबाईलचा वापर करताना सावधगिरी बाळगायला पाहिजे, यासाठी आई-वडिलांची जबाबदारी आहे असे सांगितले.फुंडे यांनी, सामाजिक गुन्हेगारीला दूर करण्यासाठी सायबर सेलची आवश्यकता आहे.समाजशील चांगली कामे करुन समाजाला उन्नतीकडे न्यावे असे सांगितले. प्रभाकर पालांदूरकर यांनी सोशल मीडियाचा वापर करताना आपण काय दक्षता घ्यायला पाहिजे याबाबत विस्तृत माहिती दिली. चाईल्ड लाईफ संस्थेचे अशोक बेडेकर यांनी १०९८ यावर फोन केल्यास नक्कीच आपल्याला मदत मिळेल असे सांगितले.संचालन संजय मारवाडे यांनी केले. आभार शिरे यांनी मानले. कार्यक्र माला शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थिनी, शिक्षिका, विविध स्वयंसेवी संस्थांच्या महिला प्रतिनिधी, पोलीस ठाण्यातील महिला दक्षता समितीच्या महिला सभासद तसेच मुलांचे पालक मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमासाठी गोंदिया पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
सायबर सुरक्षेबाबत प्रत्येकाने जागरुक रहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 06:00 IST
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांत वाढ होत चालली आहे. महिला व बालकांवरील अत्याचार देखील वाढले आहेत. ...
सायबर सुरक्षेबाबत प्रत्येकाने जागरुक रहावे
ठळक मुद्देसंडे अँकर । जगदिश पांडे : सायबर सेफ वूमन अंतर्गत कार्यशाळा