शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आईसोबत आता रोज गमाडी गंमत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 05:00 IST

कुटुंबाचीही जबाबदारी सांभाळताना नागरिकांची सेवा करताना दिसतात. कोरोनाच्या संकटात आरोग्य यंत्रणेसोबतच पोलीसही फ्रंटलाइन वॉरिअर म्हणून लढत आहेत. पोलीस ठाण्यातील इतर कामकाज सांभाळण्यापासून प्रतिबंधित क्षेत्रात शांतता राखण्यापर्यंत महिला पोलीस जबाबदारीने कर्तव्य बजावत आहेत. महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांची उकल करण्यात महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महिलांना पुरुषांपेक्षा अधिक वेळ कुटुंबाला द्यावा लागतो. आई, पत्नी म्हणून येणारी कर्तव्ये बजावत पोलीस महिलांची ड्यूटी करताना रात्री घरी परतण्याची वेळ निश्चित नसते. बऱ्याचदा रात्रपाळीतही काम करावे लागते. अशा वेळी मुलांना आईची उणीव जाणवते. तरीही मुलांच्या हट्टाला बाजूला सारून पोलीस खात्यातील ‘वूमेन वॉरिअर्स’ लेकरांना घरी ठेवून रात्री उशिरापर्यंत आपले कर्तव्य बजावित होत्या. शासनाने महिला पोलिसांना ड्यूटीत चार तासांची सूट देऊन फक्त आठच तास काम दिल्याने पोलीस मातांना आता आपल्या मुलाबाळांना वेळ देता येणार आहे.कुटुंबाचीही जबाबदारी सांभाळताना नागरिकांची सेवा करताना दिसतात. कोरोनाच्या संकटात आरोग्य यंत्रणेसोबतच पोलीसही फ्रंटलाइन वॉरिअर म्हणून लढत आहेत. पोलीस ठाण्यातील इतर कामकाज सांभाळण्यापासून प्रतिबंधित क्षेत्रात शांतता राखण्यापर्यंत महिला पोलीस जबाबदारीने कर्तव्य बजावत आहेत. महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांची उकल करण्यात महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. पुरुष कर्मचाऱ्यांइतकाच कामाचा ताण महिला पोलिसांवर देखील असतो, अशा स्थितीत अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांची मुले पाच ते सात वर्षे वयोगटातील आहेत. आईने घरीच थांबावे, असा या चिमुकल्यांचा आग्रह राहत होता. 

आता आईसोबत रोजच खेळता येणार आई पोलीस म्हणून काम करते. वडीलही आपल्या दुसऱ्या कामात व्यस्त असतात. आईला साप्ताहिक सुटी असेल त्याचदिवशी पूर्ण दिवस आई आम्हाला देते. इतर वेळी नेहमी धावपळ असल्याचे दिसून येते. शाळा बंद असल्यामुळे आम्हाला जास्तच आठवण येते; परंतु आता चार तास कामाचे कमी झाल्याने आई आम्हाला वेळ देईल.- रितिका आशिष बहेकार

कोरोनाच्या काळात आईच्या कामाची वेळ वाढली आहे. त्यामुळे ती लवकर घरी यावी, असे नेहमी वाटते. आई ड्यूटीवर जाण्यापूर्वी सगळ्या गोष्टी सांगून जाते.  आठवण आल्यानंतर फोन करून तिच्याशी बोलतो, कधी तरी ती घरी लवकर आल्यावर आम्हाला खूप आनंद होतो. आता आई दररोज आमच्या सोबत खेळणार आहे.                                           -एकांश बहेकार

आई पोलीस म्हणून काम करते.  आईला साप्ताहिक सुटी असेल, त्याचदिवशी पूर्ण दिवस आई आम्हाला देते. लगेच पोलीस ठाण्यातून फोन आला की, हातातील काम बाजूला सारून धावत-पळत ती पोलीस ठाण्यात जाते. आता आईला कामाचे तास कमी झाल्याने आई आम्हाला सहज जास्त वेळ देईल.- योगेश विजय फुंडे

 

टॅग्स :Policeपोलिस