संजय पुराम यांचे प्रयत्न : अनेक शेतकऱ्यांना दिलासा देवरी: जिल्ह्यातील बहुतांश भागात शेतकऱ्यांच्या खासगी जागेत वृक्ष लागवड करुन त्याचे संगोपन करुन वृक्षांची वाढ झाली की त्याची विक्री करुन त्यावर आर्थिक फायदा मिळवला जात असे. परंतु गोंदियाचे उपवनसंरक्षक यांच्या २५ जानेवारी २०१७ च्या पत्रानुसार जिल्ह्यातील वृक्षतोड बंद करण्यात आली होती. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. त्यावर आता तोडगा काढण्यात आला. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी व वन कंत्राटदारांनी आमदार संजय पुराम यांच्याकडे सदर वृक्षतोड बंद करण्याचे आदेश रद्द करण्यासंबंधी निवेदन सादर केले. आ.पुराम यांनी ८ मार्चला राज्याचे वनविभागाचे सचिव विकास खारगे यांची भेट घेऊन बफर झोनमध्ये गोंदिया उपवनसंरक्षक यांनी दिलेल्या वृक्षतोड बंदीचे आदेश रद्द करुन पूर्ववत सुरु करावी अशी मागणी केली. सचिव खारगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्या संबंधीचे निर्देश देऊन सदर आदेश परत घेण्यास सांगितले. त्यानुसार संबंधित वन अधिकाऱ्यांनी ते आदेश रद्द करुन पूर्ववत खासगी क्षेत्रातील वृक्षतोडीस परवानगी दिली. यावेळी वनकंत्राटदार संघटनेचे गोपाल धरमशहारे, राजू सोनवाने, श्रीधर भोंगाडे, जगदीश अंबादे, अनिल राऊत, कुंडल खंडाईत व जिल्ह्यातील इतर वन कंत्राटदार व शेतकरी उपस्थित होते.
अखेर शासनाकडून खासगी वृक्षतोडीला परवानगी
By admin | Updated: March 11, 2017 00:16 IST