शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
2
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
3
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
4
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
5
सुनेवर अत्याचार, पतीचं बाहेर अफेअर; दीप्तीच्या भावाने 'कमला पसंद'च्या मालकाच्या कुटुंबावर केले आरोप!
6
बाजारात 'सुपर फास्ट' कमबॅक! बजाज-रिलायन्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी; फक्त २ स्टॉक्स घसरले
7
चीनची दादागिरी संपणार! EV आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक 'रेअर अर्थ' खनिजांसाठी सरकारचा मोठा प्लॅन
8
घरासाठी कर्ज घेण्यास लोकांचा सरकारी बँकांवर जास्त भरोसा; ४० टक्के कर्ज ७५ लाखांपेक्षा अधिक
9
MCX च्या शेअरनं गाठला ₹१०,२५० चा उच्चांकी स्तर; ₹१२,५०० पर्यंत जाऊ शकतो भाव, काय म्हणाले एक्सपोर्ट
10
झेपत असेल तरच बघा...! एकाने झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयवर हात उचलला, तो पुरी पलटनच घेऊन आला...
11
'टेस्ला मॉडेल Y' भारतात २० लाखांनी स्वस्त होणार? कंपनीचा मोठा दावा, किंमत नाही, मालकी खर्च कमी होणार...
12
अल-कायदाचा कमांडर; पाकिस्तानमध्ये लपलाय हाफिज सईदपेक्षा मोठा दहशतवादी, अमेरिकेच्या टार्गेटवर!
13
FBI चे प्रमुख काश पटेल यांनी गर्लफ्रेंडला पुरवली कमांडो सुरक्षा, नोकरी जाण्याची चर्चा; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
14
चेतेश्वर पुजाराच्या मेव्हण्याने संपवलं जीवन, जिच्याशी ठरलेलं लग्न तिनेच केलेले 'तसले' आरोप
15
इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? अफगाणी मीडियाचा मोठा दावा, पाकिस्तानात खळबळ...
16
जय श्रीराम! सर्वांत श्रीमंत मंदिरांच्या यादीत राम मंदिर, किती कोटींची झाली कमाई? आकडे पाहाच
17
१२ महिन्यांमध्ये २९,००० अंकांच्या पार जाणार निफ्टी? रिकव्हरीच्या ट्रॅकवर जातोय का इंडेक्स?
18
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
19
बायकोची हत्या केल्याच्या आरोपाखाली पती चार महिने तुरुंगात अन् पत्नी दिल्लीत प्रियकरासोबत आनंदात!
20
लष्करात सैनिकांची कमतरता! आता दरवर्षी १ लाख अग्निवीरांची भरती केली होणार
Daily Top 2Weekly Top 5

अखेर गराडा प्राथमिक शाळा पूर्ववत सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:34 IST

पंचायत समिती गोरेगाव अंतर्गत येणाऱ्यागराडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ३ जानेवारीला स्थानिक शिक्षण विभागाने कुलूप लावले. याचा निषेध करीत पालकांनी थेट शिक्षण मंत्र्यांनाच पत्र पाठवून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता.

ठळक मुद्देएक महिन्यापासून होती शाळा बंद : गावकऱ्यांनी मानले लोकमतचे आभार

दिलीप चव्हाण ।ऑनलाईन लोकमतगोरेगाव : पंचायत समिती गोरेगाव अंतर्गत येणाऱ्यागराडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ३ जानेवारीला स्थानिक शिक्षण विभागाने कुलूप लावले. याचा निषेध करीत पालकांनी थेट शिक्षण मंत्र्यांनाच पत्र पाठवून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. लोकमतने हा मुद्दा लावून धरला. त्यामुळे शिक्षण विभागाने ६ फेब्रुवारी रोजी शाळा बंद प्रकरण चिघळत असल्याचे पाहून गराडा प्राथमिक शाळा पूर्ववत सुरू करण्याचे आदेश दिले. शाळा सुरु झाल्याचे कळताच गावकरी व पालकांनी लोकमतचे आभार मानले.प्राप्त माहितीनुसार शासनाच्या शिक्षण विभागाने ऐन सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी गराडा येथील शाळा बंद केली. या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचे मुंडीपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत समायोजन केले होते. मात्र मुंडीपार प्राथमिक शाळा गराडापासून तीन कि.मी.अंतरावर असल्यामुळे पहिली व दुसरीचे विद्यार्थी शाळेत पायी कसे जातील. असा प्रश्न उपस्थित करीत मुलांना शाळेतच न पाठविण्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे मागील ३५ दिवसांपासून गराडा येथील ११ विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होते. यासंदर्भांत पालकांनी शिक्षण विभागाच्या विरोधात रोष व्यक्त केला. गावातील शाळा बंद करु नये, असा प्रस्ताव पारीत करुन जि.प. शिक्षण विभागाकडे पाठविला. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देवून शाळा बंद न करण्याची विनंती केली. मात्र प्रशासनाने नियम पुढे करीत व वरुनच आदेश असल्याचे सांगत गराडा शाळा बंद केली. महिनाभराचा कालावधी लोटूनही प्रशासनाने यावर तोडगा काढला नाही. त्यामुळे गराडा येथील पालकांनी थेट शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहून आमरण उपोषणाचा इशारा दिला. शेवटी प्रशासनाने निर्णय मागे घेत प्राथमिक शाळा गराडा सुरु करण्याचे मौखीक आदेश दिले. तर गराडा शाळेतील आनंद गौपाले व अनिता तुरकर या दोन्ही शिक्षकांना गराडा शाळेत पूर्ववत करण्यात आले. अखेर गराडा येथील गावकºयांच्या एकजुटीेचा विजय झाला.शासन व प्रशासनाने सुरूवातील स्थानिक विद्यार्थी आणि पालकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करुन येथील शाळा बंद केली होती. मात्र गावकºयांची एकजुट आणि लोकमतच्या पाठपुराव्यामुळे शाळा पूर्ववत सुरू झाली.-शशेंद्र भगत,सरपंच, गराडा.................................गराडा येथील विद्यार्थी शाळाबाह्य होवू नये, विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये, म्हणून जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार गराडा प्राथमिक शाळा सुरु करण्याचे मौखीक आदेश देण्यात आले.-यशवंत कावळे,गटशिक्षणाधिकारी पं.स. गोरेगाव

टॅग्स :Schoolशाळा