शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

आजही त्यांची खिचडी एकातच

By admin | Updated: May 15, 2014 01:30 IST

आज भाऊच भावाच्या जीवावर उठला आहे. संपत्ती व स्वार्थापुढे नाते संबंध फिके पडताहेत. यातूनच परके तर सोडाच मात्र भाऊचं भावाचा गळा कापत आहे.

गोंदियातले जगताप कुटुंब : चार भावांचा परिवार साथ-साथकपिल केकत■ गोंदियाआज भाऊच भावाच्या जीवावर उठला आहे. संपत्ती व स्वार्थापुढे नाते संबंध फिके पडताहेत. यातूनच परके तर सोडाच मात्र भाऊचं भावाचा गळा कापत आहे. असे असतानाही मात्र कोठेतरी रक्ताच्या नात्यांतली ही गाठ आजही सैल झाली नसल्याचे बघावयास मिळत आहे. याचेच एक मुर्त उदाहरण येथील सिव्हील लाईन्स भागातील जगताप कुटुंब आहे. चार भावांचे हे कुटुंब आजही संयुक्त नांदत आहे. आजही त्यांची खिचडी एकातच असून येणार्‍या भावी पिढीसाठी आज या जगताप कुटुंबाचे आदर्श म्हणून उदाहरण दिले जात आहे.या कुटुंबाचा परिचय असा, गोपाळराव जगताप यांचे हे कुटुंब आहे. सन १९२५ मध्ये जवळील ग्राम चुलोद येथे वास्तव्यास असलेल्या गोपालराव जगताप यांचे १९४६ मध्ये गंगाबाई यांच्यासोबत लग्न झाले. रेल्वे विभागात कार्यरत गोपाळराव लग्ना नंतर सन १९४७ मध्ये गोंदियात स्थायी झाले. पुढे गंगाबाईंनी महेश, महादेव, वासुदेव, राजेंद्र, अनिल व विजय या सहा मुले आणि कमल व छाया या दोन मुलींना जन्म दिला. मुले जेमतेम मोठी होतच होती कि १९७२ मध्ये गोपाळरावांनी जगाचा निरोप घेतला. त्यावेळी महादेव हेच नोकरीवर होते व गोपाळरावांनंतर परिवाराची जबाबदारी आली ती आई गंगाबाई व थोरले सुपुत्र महेशराव यांच्यावर. मात्र महेश जगताप यांनी हि जबाबदारी उत्तमरित्या पेलली. बघता-बघता मुले-मुली मोठी झाली. महेश व राजेंद्र हे रेल्वे विभागातच नोकरीला लागले. तर वासुदेव यांना वडिलांच्या जागी नोकरी लागली. महादेव हे येथील धोटे प्रेसमध्ये कार्यरत आहेत.महेशरावांनी आपल्या थोरलेपणाचा परिचय येथेच दिला. त्यांनी सर्व धाकट्या भाऊ व बहिणींचे लग्न अगोदर उरकले व त्यानंतर शेवटी आपला विवाह केला. आज भावांमधील सर्वात धाकटे भाऊ अनिल व विजय यांचे निधन झाले असून चौघा भावांचाच परिवार गोंदियात वास्तव्यास आहे. चौघे भावंड चांगले कमावते असले तरिही त्यांचा घराचा पूर्ण कारभार आजही गंगाबाईं कडेच आहे. महेशरावांचे तसे घरातील सर्व भाऊ व सुनांना आदेशच आहे. विशेष बाब म्हणजे घरातील चारही सुना माला, उमा, कुंदा व नीताताई या सख्या बहिणींप्रमाणे एकत्रीत नांदत आहेत.यात महेश-मालाताईंना मिलिंद व भाग्यश्री, महादेव-उमाताईंना अंजली, वासुदेव-कुंदाताईंना मंजूषा, विवेक व कीर्ती तर राजेंद्र-नीताताईंना वैभव व कल्याणी ही अपत्य आहेत. यातील फक्त वैभव व कल्याणी हे शिक्षण घेत असून उर्वरितांचे लग्न झाले असून मुली आपल्या घरी सुखात नांदत आहेत. १९४७ पासून हा परिवार सिव्हिल लाईन्समध्येच वास्तव्यास असून त्यांच्या या संयुक्त कुटुंबामुळे शहरातही त्यांची वेगळी ओळख आहे.आज गंगाबाई ८४ वर्षांच्या आहेत. तरीही त्यांच्या आदेशानुसारच अख्या कुटुंबाची गाडी चालत आहे. यात वासुदेव घरचा सर्व कारभार मागील पाच वर्षांपासून बघत आहेत. तोही मात्र आई व महेशरावांच्या मार्गदर्शनातच. यांची मुले मोठी झाली, त्यांचे लग्न व अपत्य झाली असून त्यांच्यातही तीच आपुलकी बघावयास मिळते.आजही एखादा कार्यक्रम किंवा कर्तव्य असल्यास ते कुणा एका भावाच्या मुला-मुलीचेच नसून चौघा भावांसाठीचे आहे. या भावंड व त्यांच्या पत्नींमधील ही आपलुकीच आहे ज्यामुळे एवढा मोठा परिवार एकत्रीत राहत आहे. एका इमारतीतच ते सोबत राहत नसून त्यांचा स्वयंपाकही एकातच आहे. आज सुमारे १५ सदस्यांचा परिवार येथे आहे. त्यातील काही नोकरीमुळे बाहेर आहेत. मात्र सणासुदीला सर्व एकत्र आल्यावर जगताप परिवाराच्या या इमारतीतली गर्दी देखण्याजोगी असते.कुटुंबातील एकी हीच आमच्या विकासाची किल्ली आहे. कुटूंबात एकता असली तर एक शक्ती सोबत असते. घरातील मोठय़ांचा मान ठेवा, त्यांच्या मार्गदर्शनात राहावे हाच संदेश महेश जगताप या पिढीला देतात.