शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कडाक्याच्या थंडीतही मतदानाचा उत्साह कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 05:00 IST

मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी उमेदवार आणि सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मदत करताना दिसून आले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ही स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याने या निवडणुकीबद्दल सर्वांनाच उत्साह असतो. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील मतदान केंद्रांवर सकाळपासून गर्दी दिसून आली. थंडीमुळे सकाळी ९ वाजल्यानंतर मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत काही केंद्रांवर गर्दी होती.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :­ ओबीसी प्रवर्गाच्या ३० जागा वगळून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मंगळवारी (दि. २१) मतदान घेण्यात आले. जिल्हा परिषदेसाठी सरासरी ६५ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मतदारांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात सातत्याने घट होत असल्याने याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पण कडाक्याच्या थंडीतही मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले. मंगळवारी मतदानाच्या दिवशीचे चित्र पाहता ग्रामीण भागात सर्वच केंद्रांवर महिलांची गर्दी जास्त दिसत होती. अगदी नवतरुण मतदारांपासून ते शंभरी गाठलेल्या वृद्धांनीही उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला. महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव असल्यामुळे मतदानात महिलांचा उत्साह दिसून आला. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी उमेदवार आणि सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मदत करताना दिसून आले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ही स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याने या निवडणुकीबद्दल सर्वांनाच उत्साह असतो. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील मतदान केंद्रांवर सकाळपासून गर्दी दिसून आली. थंडीमुळे सकाळी ९ वाजल्यानंतर मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत काही केंद्रांवर गर्दी होती. जिल्ह्यात मतदानादरम्यान कुठल्याच मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडला नाही. सर्वच केंद्रांवर मतदान सुरळीतपणे पार पडले. नक्षलग्रस्त भागात मतदानासाठी तैनात कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारची सुरक्षा देण्यात आली होती. तसेच ३५ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली होती. 

९३ वर्षीय दिव्यांगाचे मतदान nगबोंडगावदेवी: होऊ घातलेल्या बोंडगावदेवी पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत सिलेझरी येथील सीताराम नेवू ब्राम्हणकर या ९३ वर्षीय दिव्यांगांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सिलेझरी येथील मतदान क्रमांक ४९/४१ या केंद्रावर येऊन वयोेवृद्ध असलेल्या सीताराम ब्राम्हणकर या ९३ वर्क्षीय दिव्यांगांनी आपले मतदान केले.

नक्षलग्रस्त भागात चांगला प्रतिसाद- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत नक्षलग्रस्त भागात मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ पर्यंतच ठेवली होती. तरीही त्या केंद्रांवर नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत मतदानाची आकडेवारी कमी पडू दिली नाही. आमगाव, देवरी व सालेकसा या तिन्ही तालुक्यांतील संपूर्ण मतदान केंद्र तसेच अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील झाशीनगर, गोठणगाव, बाराभाटी, ताडगाव, महागाव, केशोरी, भरनोली आणि सडक-अर्जुनी तालुक्यातील चिखली, कोकणा जमी, शेंडा व  येथील मतदान केंद्रांवर दुपारी ३ पर्यंत मतदान झाले.खातिया केंद्रावर ईव्हीएम पडली बंद - गोंदिया तालुक्यातील खातिया येथील क्र. ११४ मतदान केंद्रावर काही मतदारांचे मतदान झाल्यानंतर ईव्हीएम बंद पडली. त्यामुळे थोडा वेळ मतदान थांबविण्यात आले. त्यानंतर नवीन ईव्हीएम मशीन आणून पुन्हा मतदानाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र बंद पडलेल्या ईव्हीएम मशीनमधील मते सुरक्षित राहतील की तेवढ्या मतदारांना पुन्हा मतदानाची संधी दिली जाईल, याबाबत मतदारांनी शंका व्यक्त केली. दिव्यांगांना झाली मदत - मतदानासाठी मतदान केंद्रावर येणाऱ्या दिव्यांगांची गैरसोय होऊ नये यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे मतदान केंद्रावर त्यांची गैरसोय झाली नाही. दिव्यांगांच्या नातेवाइकांनी त्यांना केंद्रावर नेऊन मतदान करण्यास मदत केली. 

 

टॅग्स :Electionनिवडणूक