शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

लाखो रुपये खर्चूनही कोल्हापुरी बंधारे शोभेचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:52 AM

दुष्काळी स्थिती बंधाऱ्याच्या मदतीने शेतीला सिंचनाची सोय करता यावी. यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी लाखो रुपये खर्चून कोल्हापुरी बंधारे तयार करण्यात आले. बंधारे तयार केल्यानंतर मात्र त्यांच्या देखभाल दुरूस्तीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हे कोल्हापुरी बंधारे केवळ शोभेची वस्तू ठरत आहे.

ठळक मुद्देदेखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष : शेतकरी सिंचनापासून वंचित

राजेश मुनीश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : दुष्काळी स्थिती बंधाऱ्याच्या मदतीने शेतीला सिंचनाची सोय करता यावी. यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी लाखो रुपये खर्चून कोल्हापुरी बंधारे तयार करण्यात आले. बंधारे तयार केल्यानंतर मात्र त्यांच्या देखभाल दुरूस्तीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हे कोल्हापुरी बंधारे केवळ शोभेची वस्तू ठरत आहे.शिवकालीन काळातील माती अडवा, पाणी जीरवा हा मुलमंत्र पुढे जोपासत तालुक्यातील वडेगाव, रेंगेपार, बाम्हणी-सावंगी, मनेरी, डव्वा, कोसमतोंडी, पांढरी, खाडीपार, घोटी, सौंदड, राका, सिंदीपार, शेंडा, जांभळी, दोडके, पाटेकुर्रा, कोकणा-जमी, बाम्हणी-खडकी, ओवारा, देवपायली, घाटबोरी, कोहमारा, डुग्गीपार, पांढरवानी, खोबा, घोटी, म्हसवानी, खोडशिवनी, गिरोला, टेमनी या भागात मोठ मोठे कोल्हापुरी बंधारे आजही अस्तीत्वात आहेत. या बंधाºयांमुळे हजारो हेक्टरला सिंचनाची सोय होवू शकते. मात्र बंधाºयाच्या देखभाल दुरूस्तीकडे जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. बंधाºयांना मोठ मोठे भगदाड पडले आहे.त्यामुळे यामध्ये पाणी साठवून राहण्याऐवजी ते वाहून जात आहे. परिणामी शेतकºयांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. सिंचन विभाग या जुन्या कोल्हापुरी बंधाºयाची डागडुजी करण्याऐवजी नवीन बंधारे तयार करण्यावर भर देत आहे. सडक-अर्जुनी तालुक्यात सौंदड-राका येथे लाखो रुपये खर्चून मोठा कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला. पण त्यांची योग्य देखभाल दुरूस्ती न केल्याने त्यांची हालत खस्ता झाली आहे. विशेष म्हणजे या बंधाऱ्यांकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे सुध्दा दुर्लक्ष झाले आहे.दोन्ही बंधाऱ्यांत पाण्याचा अभावकाळा गोटा १ व २ हा कोल्हापुरी बंधारा तयार केल्यानंतर या बंधाºयांमध्ये एकही वर्षी पाणी साठवून ठेवण्यात आले नाही. विशेष म्हणजे पुराचा तडाखा बसल्याने या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजुला खिंड पडली. त्यामुळे बंधाऱ्यातील पाणी वाहून जाते. त्यामुळे लाखो रुपये खर्चून करुन तयार करण्यात आलेले हे दोन्ही बंधारे केवळ नावापुरतेच ठरत आहे.तालुक्यात ५५ हजार हेक्टर क्षेत्रसडक-अर्जुनी तालुक्याचे एकूण ५५ हजार ४६१ हेक्टर भौगोलिक क्षेत्र आहे. यात पिकाखालील क्षेत्र २५ हजार ७८८ हेक्टर आर क्षेत्राचा समावेश आहे. कोरडवाहू क्षेत्र ८ हजार ९१७ हेक्टर आर आहे. तालुक्यात धान, तूर, तिळ, उस, मूंग, टरबूज, भेंडी, काकडी, चवळी, दोडके आदींचे उत्पादन घेतले जाते.तर हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखालीवडेगाव येथील काळा गोटा १ व २ या बंधाºयाची केवळ डागडुजी केल्यास रेगेंपार, वडेगाव, डोयेटोला, मुनीश्वर पाटीलटोला, केसलवाडा, पांढरवानी, परसोडी, डोंगरगाव, खजरी, नवाटोला या परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याचा मार्ग मोकळा होईल. वडेगाव, डोंगरगाव, परसोडी, केसलवाडा, सडक-अर्जुनी या परिसरात पडीक असलेल्या शेकडो हेक्टर जमिनीला सिंचनाची सोय होईल. शिवाय शेतकºयांना दुबार पिके घेता येता येण्याची शक्यता नाकारता येत नाही.