शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

२८0 कंत्राटी परिचारिकांच्या कामाचे मूल्यमापन करा

By admin | Updated: June 4, 2014 00:09 IST

गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत येणार्‍या आरोग्य विभागात कंत्राटी आरोग्य सेविकांची २३६ पदे मंजूर आहेत. परंतु गोंदिया जि.प. आरोग्य विभागांतर्गत २८0 कंत्राटी आरोग्य सेविकांची नियुक्ती झालेली आहे.

कंत्राटी सेविकांची मागणी : सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन सुरूगोंदिया : गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत येणार्‍या आरोग्य विभागात कंत्राटी आरोग्य सेविकांची २३६ पदे मंजूर आहेत. परंतु गोंदिया जि.प. आरोग्य विभागांतर्गत २८0 कंत्राटी आरोग्य सेविकांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे पीआयपी अंतर्गत मंजूर पदे व कंत्राटी आरोग्य सेविकांची संख्या पाहता नेहमीच आंदोलन केले जाते. यामुळे जिल्हा परिषदेने कंत्राटी म्हणून असलेल्या २८0 आरोग्य सेविकांच्या कामाचे मूल्यमापन केल्यानंतरच त्यांना नियुक्ती द्यावी, अशी मागणी धरणा आंदोलनावर बसलेल्या कंत्राटी आरोग्य सेविकांनी केली आहे. सोमवारपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर ४४ कंत्राटी आरोग्य सेविकांचे धरणे आंदोलन सुरू झाले आहे. १७ मे रोजी जिल्हा परिषद सदस्या स्थायी समितीच्या सभेत अधिकार्‍यांनी या आरोग्य सेविकांची सेवाज्येष्ठता यादी नसल्याचे मान्य केले. २३६ पदे कंत्राटी आरोग्य सेविकाची मंजूर असताना तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी भिमराव मेश्राम यांनी अधिकच्या आरोग्य सेविकांना नियुक्ती दिल्यामुळे जुन्या कंत्राटी आरोग्य सेविकाही अडचणीत आल्या. परिणामी जिल्हा परिषदेने वर्षभरापूर्वी ९६ आरोग्य सेविकांना सेवेत कमी केले. त्यामुळे त्या आरोग्य सेविकांनी आंदोलन केल्यामुळे ४४ आरोग्य सेविकांना घेण्यात आले. परंतु मार्चनंतर त्या ४४ आरोग्य सेविकांना पुनर्नियुक्तीचे आदेश दिले नाही. जिल्हा परिषद फक्त २३६ कंत्राटी आरोग्य सेविकांची पीआयपी मंजूर असल्याचे सांगते. परंतु २३६ ठिकाणी कामावर असलेल्या आरोग्य सेविकांचे काम कसे आहे. त्यांचे मूल्यमापन न करता सरळ त्यांना नियुक्ती दिली जाते. तर या ४४ आरोग्य सेविकांना वारंवार आपल्या अधिकारासाठी जिल्हा परिषदेसोबत भांडावे लागते. जिल्हा परिषदेने २३६ पीआयपीसाठी असलेल्या २८0 कंत्राटी आरोग्य सेविकांच्या कामाचे मूल्यमापन केल्यानंतरच त्यांना नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. कंत्राटी आरोग्य सेविकेच्या नियुक्तीबाबत मागील दोन महिन्यापासून त्या ४४ आरोग्य सेविका जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या चकरा काढीत आहेत. जेएसवाय मानव विकास मातृत्व योजनांना सहकार्य करून कुटुंब नियोजनाचे उद्दिष्ट पूर्ण करणार्‍या या ४४ कंत्राटी आरोग्य सेविकांना जिल्हा आरोग्य अधिकार्‍याच्या अनागोंदी कारभारामुळे घेण्यात आले नाही. जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील संपूर्ण कंत्राटी आरोग्य सेविकांच्या कामाचे मूल्यमापन करून त्यांना नियुक्तीचे आदेश द्यावे, अशी मागणी केली आहे. या मागणीला घेऊन जिल्हा परिषदेसमोर त्या ४४ आरोग्य सेविका बेमुदत आंदोलन करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)