या सोहळ्याचे उद्घाटन म्हणून आ. मनोहरराव चंद्रीकापुरे यांच्या हस्ते होणार असून माजी मंत्री राजकुमार बडोले हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. यावेळी खा. सुनील मेंढे, रचना गहाणे, चंद्रशेखर ठवरे, रत्नदीप दहिवले, किशोर तरोणे, मुन्नाभाई नंदागवळी, लायकराम भेंडारकर, देवला मरस्कोल्हे, अंताराम राखडे, अरविंद शिवणकर, लोकपाल गहाणे, उमाकांत ढेंगे, राजेश नंदागवळी, गजानन डोंगरवार, अजय लांजेवार, लिना बोरकर, शरद अवसरे, तहसीलदार विनोद मेश्राम, पोलीस निरीक्षक महेश तोंदले, श्वेता कुलकर्णी, यशवंत गणवीर, सोनदास गणवीर, अमर ठवरे, सुरेंद्र ठवरे, दिपंकर उके, भोजराम डोंगरे, मोरेश्वर सोनवाने, व्यंकट खोब्रागडे, गंगाधर परशुरामकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दोन दिवसीय कार्यक्रमात भिक्षूंकडून मूर्तीस्थापना, ध्वजारोहण, ऑर्केस्ट्रा एक रात्र बा भीमाची, बुध्दवंदना, धम्म रॅली, सत्कार समारंभ, भोजनदान, नाटक-साजना शोधू कुठे किनारा अशा कार्यक्रमाची मेजवानी आयोजित केली आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष तुकाराम शेंडे, रामचंद्र हुमणे, नानाजी रामटेके, लखन खोब्रागडे, रघुनाथ शेंडे, युवराज डोंगरे यांनी केले आहे.