शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

पर्यावरणज्ञान मंजुषा सत्कार व बक्षीस वितरण

By admin | Updated: February 22, 2016 02:00 IST

त्रिपुर सुंदरी गडमाता मंदिर समिती आमगाव खुर्द, श्री सत्संग विठ्ठल रुख्मिणी मंदिर समिती व श्री सत्संग लहरी महाराज मंदिर समिती आमगाव खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने ...

कीर्तनातून समाजजागृती : पुंडलिक महाराज जयंती कार्यक्रम सोनपुरी : त्रिपुर सुंदरी गडमाता मंदिर समिती आमगाव खुर्द, श्री सत्संग विठ्ठल रुख्मिणी मंदिर समिती व श्री सत्संग लहरी महाराज मंदिर समिती आमगाव खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिपुर सुंदरी गडमातादेवी, विठ्ठल रुखमाई देवस्थान आमगाव खुर्द येथे पुंडलिक जयंती, तनपुरे महाराज जयंती, नरहरी महाराज पुण्यतिथी व पर्यावरण ज्ञान मंजुषा सत्कार व बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात ब्रम्हज्योत प्रज्वलित करुन करण्यात आली. कार्यक्रमात हभप खोटेले महाराज यांनी हरिपाठ, सामुदायिक प्रार्थना सादर केले. हभप रुखनलाल बिसेन यांनी कीर्तन सादर केले. कार्यक्रमात कीर्तनाच्या माध्यमातून समाजजागृती करण्यात आली. तसेच भक्तीमार्गाने आत्मशांती मिळते, असे सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी दहिहांडी पूजन, गोपालकाला व सत्कार कार्यक्रम घेण्यात आले आणि शिवाजी जयंती साजरी करण्यात आली.सर्वप्रथम विठ्ठल रुखमाई देवस्थानमध्ये माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य लखनलाल अग्रवाल होते. बक्षीस वितरक म्हणून जि.प. सदस्य सुरेश हर्षे, सालेकसाचे तहसीलदार प्रशांत सांगळे, आमगाव खुर्दचे सरपंच योगेश राऊत, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष वासुदेव चुटे, सोनार समाज गोंदियाचे अध्यक्ष सुनील भज्जे, कुंदन बहेकार, सोनार समाजाचे महासचिव मधुकर कावडे, ब्रजभूषण बैस, यादवराव गौतम, हिवराज कावळे, भुजाडे, मुरलीधर करडे, धोटू राऊत, गुणवंत बिसेन, गौरीशंकर बिसेन, राजकुमार बसोने, टी.आर. लिल्हारे, मुरलीधर कावडे, ओमप्रकाश भास्कर, वनरक्षक एफ.सी. शेंडे, गिरोलाचे सरपंच राधिका वडगाये, पार्बता नेवारे, पुरुषोत्तम बागडे, परसराम मोटघरे उपस्थित होते.कार्यक्रमात जि.प. सदस्य सुरेश हर्षे यांनी समाजजागृती कीर्तनाच्या माध्यमातून करता येते. त्यासाठी आपण योग्य ती मदत करण्यात सदैव तत्पर आहोत, असे म्हटले. त्यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. याप्रसंगी लखनलाल अग्रवाल, ब्रजभूषण बैस, राजकुमार बसोने, तहसीलदार प्रशांत सांगळे, सुनील भज्जे यांनी समयोचित विचार व्यक्त केले. या वेळी वनविभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या पर्यावरण ज्ञान मंजुषा परीक्षेचे पुरस्कार वितरण करण्यात आले व विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आले. पर्यावरण ज्ञान मंजुषा परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना अतिथींच्या हस्ते पर्यावरण जाणीव जागृतीपर पुस्तके, इंग्रजी स्पिकिंग कोर्स, इंग्रजी ग्रामर, सामान्य ज्ञान, इंग्रजी डिक्सनरी देण्यात आली. वनविभागाच्या वतीने वनरक्षक एस.सी. शेंडे यांच्या सौजन्याने विविध शाळेत पर्यावरण ज्ञान मंजुषा परीक्षा घेण्यात आली होती. कार्यक्रमात पाणलोट कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गौरीशंकर बिसेन, पर्यावरण संतुलन जनजागृतीसाठी उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल कहाली शाळेचे पदवीधर शिक्षक राजकुमार बसोने, सरपंच राधिका वडगाये व इतर मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पर्यावरण पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.प्रास्ताविक वासुदेव चुटे यांनी मांडले. संचालन राकेश रोकडे यांनी केले. आभार एफ.सी. शेंडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी त्रिपुर सुंदरी गडमाता मंदिर समिती आमगाव खुर्द, श्री सतसंग विठ्ठल रुख्मिनी मंदिर समिती, श्री सतसंग नरहरी महाराज मंदिर समिती आणि क्षेत्रीय ग्रामवासी आमगाव खुर्द यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)