शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

डांबर प्रकल्पामुळे पर्यावरणाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 21:21 IST

निसर्गाने मुक्त उधळण केलेल्या सिरेगावबांधच्या रम्य परिसरात हॉट मिक्सींग डांबर प्लांट बसविण्यात आले. यामुळे सिरेगावबांध तलावातील जैवविविधता, विदेशी पक्ष्यांचा मुक्तसंचार व नजीकच्या पहाडावरील वन्यप्राण्यांचे पाणवठा स्थानाला अडथळे निर्माण झाले आहेत.

ठळक मुद्देपरवानगीबाबत तर्कवितर्क : विदेशी पक्षी व वन्यजीवांच्या मुक्तसंचारात अडथळा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : निसर्गाने मुक्त उधळण केलेल्या सिरेगावबांधच्या रम्य परिसरात हॉट मिक्सींग डांबर प्लांट बसविण्यात आले. यामुळे सिरेगावबांध तलावातील जैवविविधता, विदेशी पक्ष्यांचा मुक्तसंचार व नजीकच्या पहाडावरील वन्यप्राण्यांचे पाणवठा स्थानाला अडथळे निर्माण झाले आहेत. निसर्गरम्य ठिकाणी या प्लांटची निर्मिती हा परिसरात चर्चेचा विषय आहे.सोमलपूर-गंगेझरी येथील गट क्रमांक-१०६ लगत सिरेगावबांध तलाव आहे.या तलावाशेजारी आमराई आहे. या तलावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात हिवाळ््यात विदेशी पक्षांचे आगमन होते. लागूनच पहाड व जंगल परिसर असल्याने जलाशयाच्या पाणवठ्यावर वन्यप्राण्यांचा संचार असतो. हा परिसर सानगडी-नवेगावबांध मार्गावर आहे. नवेगावबांध व्याघ्र प्रकल्प व इटियाडोह धरण बघण्यासाठी येणारे पर्यटक या निसर्गरम्य ठिकाणी थांबले नाही तर नवलच! अशा या निसर्गदत्त ठिकाणी एक महिन्यापूर्वी हॉट मिक्स डांबर प्लांट उभारण्यात आले आहे.महाराष्ट्र शासनाने शतकोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे. या उद्दिष्टपृूर्तीसाठी गेल्या तीन ते चार वर्षांपासून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मात्र दुसरीकडे जागा बळकावून त्या जागेवरील झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे. याठिकाणी वृक्ष लागवड योजनेंतर्गत आंबा, जांभुळ व इतर वृक्ष लागवड करण्यात आली होती असे गावकरी सांगतात. आज त्याठिकाणी लागवड केलेले वृक्षच दृष्टीस येत नाही. या वृक्षांची कत्तल झाली की ते जगलेच नाही हा खरा प्रश्न आहे. एक मात्र खरे की, या ठिकाणी असलेली झुडपे नष्ट झाली आहे, हे वास्तव आहे.या ठिकाणी प्लांट उभारणीसाठी शासकीय विभाग व ग्रामपंचायतने परवानगी अथवा नाहरकत प्रमाणपत्र दिलेच कसे? हा संशोधनाचा विषय आहे. परवानगी दिली नसेल तर महसूल व वनविभाग मूग गिळून गप्प का आहे?याची शहानिशा करणे गरजेचे आहे.या प्रकारामुळे पक्षी अभ्यासक कमालीचे निराश झाले असून पक्ष्यांचे आश्रयस्थान व मुक्तसंचार धोक्यात आल्याची बाब त्यांना खटकत आहे. यामुळे पुढील वर्षी कदाचित या परिसरात विदेशी पक्षांचा मुक्तसंचार न्याहाळण्याची संधी उपलब्ध होणार नाही ही भीती त्यांच्या मनात घर करुन आहे. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.तो डांबर प्लांट हटवा- तरोणेसिरेगावबांध हे तालुक्याचे वैभव आहे. परिसर जैवविविधतेने नटलेला आहे. दरवर्षी हिवाळ्यात याठिकाणी मोठ्या प्रमाणावर सातासमुद्रापलीकडून विदेशी पक्षी हजेरी लावतात. या काळात पर्यटकांना एक पर्वणीच असते. मात्र या प्लांटमुळे येथे धूळ होईल. वाहनांच्या आवागमनामुळे ध्वनी प्रदूषण होईल शिवाय विदेशी पक्षी व वन्यप्राण्यांच्या दैनंदिन मुक्तसंचारात अडथळे निर्माण होतील. शिवाय नैसर्गिक जैवविविधता नष्ट होईल. आमराईतील गावरान आंब्याच्या आस्वादापासून ग्रामस्थांना वंचित व्हावे लागेल शिवाय पर्यावरणाला धोका निर्माण होईल, अशी भीती जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी व्यक्त केली. प्रशासनाने हा प्लांट तातडीने हटविण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी,उपवनसंरक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग,विभागीय आयुक्त व पर्यावरण विभागाकडे केली आहे.

टॅग्स :environmentवातावरण