शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर चौकातील नाल्यांवर अतिक्रमण

By admin | Updated: July 15, 2015 02:18 IST

नगरातील मुख्य रहदारीचे ठिकाण आंबेडकर चौक असून त्याच्या जवळपास पुन्हा अतिक्रमण वाढले आहे.

आमगाव : नगरातील मुख्य रहदारीचे ठिकाण आंबेडकर चौक असून त्याच्या जवळपास पुन्हा अतिक्रमण वाढले आहे. मुख्य मार्गावरील रहदारी ही मोठी गंभीर बाब आहे. नवीन तयार करण्यात आलेल्या नालीसमोर अनेकांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले. या अतिक्रमणामुळे ये-जा करणाऱ्यांना धोक्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे हे अतिक्रमण त्वरित हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नगरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमण ही मोठी डोकेदुखीची समस्या आहे. आंबेडकर चौकापासून नगरप्रवेशपर्यंत अनेकांनी डांबरी रस्त्यावर अनेकांनी आपली दुकाने सुरु केली आहेत. रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणामुळे रहदारीला खूप अडचण होत आहे. तयार करण्यात आलेल्या नालीच्या मागे दुकान सुरु झाले असते किंवा मागे दुकान हटविले तर रहदारीस त्रास होणार नाही. मात्र सर्व नियम धाब्यावर ठेऊन राजरोसपणे अनेकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. दुकानासमोर ग्राहकांच्या गाड्या उभ्या केल्याने चारचाकी वाहनांना ये-जा करणे खूप धोक्याचे आहे. एखाद्या वेळी मोठा अपघात घडल्यानंतरच संबंधित विभागाला जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)रस्त्यांवरच केली जातात वाहने पार्कआमगावातील मेन रोडवर करण्यात आलेल्या अतिक्रमणाकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. रस्त्यावरच वाहने पार्क करण्यात येत असल्याने ये-जा करण्यास नागरिकांना मोठाच त्रास होतो. आंबेडकर चौक ते कामठा चौक, आंबेडकर चौक ते देवरी मार्ग व आंबेडकर चौक ते स्टेशन रोडच्या दुतर्फा अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे रस्ते अरूंद होत चालले असून रहदारी बाधित होण्यास हेच अतिक्रमण कारणीभूत ठरत आहे. संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन सदर समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.