शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणधारकांना मिळणार स्थायी पट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 21:26 IST

शहरातील संजयनगर-छोटा गोंदिया परिसरातील जवळपास ७०० अतिक्रमणधारकांना जमिनीचे स्थायी पट्टे मिळवून देण्यासाठी आ.गोपालदास अग्रवाल यांनी वन विभाग व शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.

ठळक मुद्देकेंद्र सरकारकडे पाठविला प्रस्ताव : ४० वर्षांपासूनचा प्रश्न लागणार मार्गी

ऑनलाईन लोकमतगोंदिया : शहरातील संजयनगर-छोटा गोंदिया परिसरातील जवळपास ७०० अतिक्रमणधारकांना जमिनीचे स्थायी पट्टे मिळवून देण्यासाठी आ.गोपालदास अग्रवाल यांनी वन विभाग व शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर आता हा प्रस्ताव अंतीम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार असून त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.प्राप्त माहितीनुसार शहरातील संजयनगर-छोटा गोंदिया परिसरातील जवळपास ७०० अतिक्रमणधारकांना जमिनीचे स्थायी पट्टे मिळवून देण्यासाठी आ. अग्रवाल यांचा पाठपुरावा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या उपस्थितीत आ. अग्रवाल यांनी मंत्रालयात बैठक घेतली. तसेच हा परिसर झुडपी जंगलाच्या कायद्यातून मुक्त करुन अतिक्रमणधारकांना पट्टे देण्याची मागणी केली. या भागातील नागरिकांना मागील ३० ते ४० वर्षांपासून पट्टे न मिळल्याने रस्ते, वीज इतर मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. मागील ३० ते ४० वर्षांपासून या परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना या ठिकाणाहून हटविणे शक्य नाही. त्यामुळे सरकारने हा या अतिक्रमणधारकांना स्थायी स्वरुपात पट्टे देऊन त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी आ. अग्रवाल यांनी केली. यानंतर प्रधान सचिव खारगे यांनी जिल्हाधिकारी व उपवनसंरक्षक यांची बैठक घेवून त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतली. यात दिंरगाई केल्याबद्दल उप वनसंरक्षकांना धारेवर धरले. खारगे यांनी संजयनगर-छोटा गोंदिया परिसरातील अतिक्रमणधारकांना वन कायद्यातून मुक्त करुन स्थायी स्वरुपात पट्टे देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे प्रयत्न करणार आहे.येत्या दोन तीन महिन्यात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे लवकरच या परिसरातील नागरिकांना स्थायी स्वरुपात जमिनीचे पट्टे मिळण्याची शक्यता आ. गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल