शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

महिनाभरापासून रूग्णांचे वॉर्ड रिकामेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 23:43 IST

मागील वर्षी पावसाळ्यात येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील (बीजीडब्ल्यू) प्रसूती वॉर्डात पावसाचे पाणी साचून महिला रुग्णांची गैरसोय झाली होती. ‘लोकमत’ने हा मुद्दा लावून धरल्यानंतर या इमारतीचे स्ट्रॅक्चरल आॅडिट करण्यात आले.

ठळक मुद्देरूग्णालयात रूग्णांची हेळसांड : बीजीडब्ल्यू रूग्णालयातील समस्या सुटेना, महिला रूग्णांची गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षी पावसाळ्यात येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील (बीजीडब्ल्यू) प्रसूती वॉर्डात पावसाचे पाणी साचून महिला रुग्णांची गैरसोय झाली होती. ‘लोकमत’ने हा मुद्दा लावून धरल्यानंतर या इमारतीचे स्ट्रॅक्चरल आॅडिट करण्यात आले. त्यात ही इमारत जीर्ण झाली असल्याचीे बाब पुढे आली होती. या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गंगाबाईच्या फर्शची उंची वाढविण्याचे आदेश दिले. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने आठवडाभरात हे काम करून देतो म्हणून रूग्णांचा मोठा वॉर्ड रिकामा करविला. परंतु महिनाभरापासून हे काम झाले नसल्याने पावसाळ्यात रूग्णांचे हाल होत आहेत.येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील वॉर्डात पाणी साचल्यानंतर या रुग्णालयातील अनागोंदी कारभार आणि प्रशासनाच्या वेळ काढू धोरणाची पोलखोल झाली होती. मागील वर्षी ६ जुलै रोजी या रुग्णालयाच्या इमारतीत पाणी साचून मोठी खळबळ उडाली होती. यात तीन वर्षांपासून बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिटच सार्वजनिक बांधकाम विभागाने केले नसल्याची बाब पुढे आली होती. जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना वेळीच उपचार मिळावा, यासाठी शासनाने येथे बाई गंगाबाई महिला रुग्णालय सुरु केले. रूग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सन १९३९ मध्ये करण्यात आले. एकूण २०० खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात सध्या केवळ १८५ खाटाच उपलब्ध आहे. त्यामुळे बरेचदा दाखल रुग्णांची सख्या वाढल्यास त्यांना रुग्णालयाच्या वºहांड्यात खाटा लावून दाखल केले जाते.रुग्णालयाच्या इमारतीला ८० वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असून इमारत जीर्ण झाली आहे. यामुळे पावसाळ्यात काही ठिकाणी गळती लागते. या रूग्णालयात महिला तसेच लहान बालकांना दाखल करुन उपचार केले जाते. त्यामुळेच जीर्ण झालेल्या इमारतीमुळे रुग्णांच्या जीवाला कुठलाही धोका होऊ नये, यासाठी या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासाठी बीेजीडब्ल्यू रुग्णालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला सन २०१५ पासून वारंवार पत्र दिले. पण तीन वर्षांचा कालावधी लोटूनही बांधकाम विभागाने इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट केले नव्हते. त्यानंतर ‘लोकमत’ने हा विषय लावून धरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांकडून आठ दिवसांत इमारतीचा अहवाल मागीतला होता. त्यानंतर इमारतीचे स्ट्रक्टचरल आॅडिट करण्यात आले होते. याला वर्षभराचा कालावधी लोटल्यानंतर १६ जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी रुग्णालयाला भेट देऊन इमारतीची पाहणी केली.तसेच या इमारतीच्या फर्शची उंची एक फुटाने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच बांधकामाला सुरूवात करण्याचे सांगून बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात शस्त्रक्रियेसाठी येणाºया महिलांना थांबविण्यासाठी असलेला वॉर्ड महिनाभरापासून रिकामा करविण्यात आला. त्या वॉर्डात तोडफोड करून सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्धे कामही केले नाही. त्यामुळे दररोज २५ गर्भवतींची हेळसांड रूग्णालयात होत आहे. शासनाने मागील वर्षी या कामासाठी २२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. परंतु काम अद्याप झाले नाही.विभागाच्या दिरंगाईचा गर्भवतींना फटकाबीजीडब्ल्यू रुग्णालयाची जीर्ण झालेली इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत तयार करण्यात येणार आहे. त्याचा प्रस्ताव सुद्धा मंजूर झाला आहे. मात्र आता पावसाळ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीच्या फर्शची उंची एक फुटाने वाढविण्याचे काम सुरू करण्याचा फक्त कांगावा केला आहे. आठवडाभरासाठी रिकामा करण्यात आलेला गर्भवतींचा वॉर्ड आता महिना उलटूनही गर्भवतींना देण्यात आला नाही. किमान तीन फूट उंची वाढविणे आवश्यक होते. याकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पी.व्ही. रूखमोडे हे सुद्धा दुर्लक्ष करीत आहेत. विभागातील अधिकारी व विभागांच्या कारभाराच्या दिरंगाईत मात्र गरीब गर्भवती महिलांना फटका बसत आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल