शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

‘त्या’ ५० युवक-युवतींचा रोजगार थांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

हाजराफॉल गोंदिया जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व आकर्षक पर्यटन केंद्र असून या पर्यटन केंद्राचा आनंद लुटण्यासाठी दूरवरचे पर्यटक नेहमी येथे येतात.अशात त्यांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा, परिसरातील अनेक दर्शनीय केंद्र आणि खेळांचा आनंद घेण्याची सोय तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोणातून येथील युवक-युवती सेवा देतात. तसेच पर्यटन केंद्राचे व्यवस्थीत संचालन करीत आहेत.

ठळक मुद्देकोरोनामुळे हाजराफॉल बंद : वन व्यवस्थापन समितीला बसतोय आर्थिक फटका

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यात सर्वदूर प्रसिद्ध असलेला तालुक्यातील हाजराफॉल पर्यटकांना वर्षभर भुरळ घालणारा आहे. हे पर्यटन केंद्र परिसरातील ५० युवक-युवतींना वर्षभर रोजगार उपलब्ध करून देते. परंतु कोरोनामुळे मागील १ महिन्यापासून हाजराफॉल पर्यटन स्थळ बंद केल्याने त्या युवक-युवतींचा रोजगार थांबला आहे.हाजराफॉल गोंदिया जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व आकर्षक पर्यटन केंद्र असून या पर्यटन केंद्राचा आनंद लुटण्यासाठी दूरवरचे पर्यटक नेहमी येथे येतात.अशात त्यांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा, परिसरातील अनेक दर्शनीय केंद्र आणि खेळांचा आनंद घेण्याची सोय तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोणातून येथील युवक-युवती सेवा देतात. तसेच पर्यटन केंद्राचे व्यवस्थीत संचालन करीत आहेत.या सेवेसाठी संयुक्त वन व्यवस्थापन समिती (नवाटोला) यांच्यामार्फत गाव व परिसरातील युवा उत्साही व कर्तव्यनिष्ठ मुला-मुलींना काम दिले जात असून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. हाजराफॉल परिसरातील गावे आदिवासीबहुल व मागासलेले असून या क्षेत्रात रोजगाराचे कोणतेच साधन नाहीत. अशात हाजराफॉलमुळे नवाटोला व कोसमतर्रासह या परिसरातील ४-५ गावांतील युवक-युवतींना रोजगार मिळाला.सन २०१४ मध्ये काही मोजक्या ५-७ युवकांनी या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवून सेवा कार्याला सुरूवात केली होती. आज या ठिकाणी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून २६ मुली आणि २४ मुलांना रोजगार देण्यात आला आहे.मागील काही वर्षात काही युवक-युवतींनी संसार थाटून आपली सेवा सुरू ठेवली. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने हाजराफॉल बंद केल्यामुळे त्यांचा रोजगार थांबला आणि आर्थिक अडचण निर्माण होऊ लागली आहे.२४ मार्च रोजी देशात ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात आले. परंतु कोविड-१९ व्हायरसचा देशात संसर्ग वाढताना पाहून पर्यटन विभागाने आधीच खबरदारी घेतली. त्यानुसार स्थानिक वन विभागाने ‘लॉकडाऊन’च्या ८ दिवसांपूर्वीच हाजराफॉल बंद केले.त्यामुळे येथे काम करणारे सर्व ५० युवक-युवती आपापल्या घरी बेरोजगार होऊन बसलेत. अशात त्यांना आपले कुटुंब चालविणे कठीण होऊ लागले आहे.हाजराफॉल केव्हा सुरू होणार?देशात कोरोना संसर्गाचा धोका झपाट्याने वाढत चालला असून हजारो लोक संक्रमित झाले आहेत. हा प्रादुर्भाव केव्हा थांबेल हे सांगणे सध्यातरी खुपच कठीण आहे. पर्यटन क्षेत्रात येणारे बहुतांश पर्यटक शहरातून येतात. अशात पुढील कित्येक महिने कोरोनाचा संसर्ग राहण्याची भीती कायम राहणार आहे. त्यामुळे पुढे पावसाळा सुरू झाला तरी हाजराफॉल खुले करणे शक्य नाही. याचा थेट फटका येथील काम करणाऱ्यांना बसणार आहे.शासनाकडून मदत मिळावीहाजराफॉल बंद झाल्यामुळे येथे काम करणाऱ्या युवक-युवतींच्या हाताला मिळणारे काम बंद झाले. त्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. अशात संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या मार्फत शासनाने त्या युवक-युवतींना लॉकडाऊन दरम्यान आर्थिक मदत करण्याची मागणी आहे.

कोवीड-१९ या संसर्गाच्या आजारावर पूर्णपणे नियंत्रण मिळविल्याशिवाय पर्यटन स्थळ सुरू होणार नाही. अशात संबंधित विभागाचे आदेश मिळेपर्यंत हाजराफॉल सुद्धा बंद ठेवण्यात येईल.-अभिजीत ईलमकरवन परिक्षेत्राधिकारी, सालेकसा

टॅग्स :forest departmentवनविभागHajara Fallहाजराफॉल