शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विकास कामातून निर्माण होणार रोजगाराच्या संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:34 IST

विविध भागाचा विकास करण्यासाठी आणि शासनाकडून विकास कामे खेचून आणण्यासाठी लोकप्रतिनिधीकडे दूरदृष्टी असावी लागते.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विविध भागाचा विकास करण्यासाठी आणि शासनाकडून विकास कामे खेचून आणण्यासाठी लोकप्रतिनिधीकडे दूरदृष्टी असावी लागते. ती असल्यास नक्कीच विकासाला गती मिळते. याच विकास कामातून रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी येथे केले.स्थानिक विकास आमदार निधीतून मंजूर रस्ता बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते लोधीटोला येथे बोलत होते. या वेळी प.स.उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, जि.प.सदस्य सिमा मडावी, माजी जि.प.सदस्य मुनेंद्र नांदगाये, प.स.सदस्य प्रिया मेश्राम, माजी सभापती स्रेहा गौतम, डॉ.सुनील कटरे, प.स.सदस्य योगराज उपराडे, सरपंच संजय ठाकरे, उपसरपंच पगरवार, गजानंद कावळे, योगराज अटरे, विनोद ठाकरे, विश्राम अटरे उपस्थित होते. अग्रवाल म्हणाले, या परिसराच्या विकासासाठी मी सदैव कठिबध्द आहे. मुर्री येथे नवबौध्द विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळेची स्थापना, मुर्री ते चुटिया-पांगडी या रस्त्याचे काम आणि पांगडीला पर्यटनस्थळ म्हणून विकसीत करण्याचा मानस आहे. तसेच पर्यटनाच्या माध्यमातून परिसरातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रकाश रहमतकर यांनी आ.अग्रवाल यांच्यामुळे परिसरातील अनेक समस्या मार्गी लागल्या. ते सदैव जनतेशी कनेक्ट राहणारे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळे पुलाची समस्या मार्गी लागल्याचे सांगितले. या वेळी १० लाख रुपये खर्चून मुर्री-पांगडी, लोधीटोला रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.