शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

कर्मचाऱ्यांचे निवास झाले ‘भूतबंगले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:43 IST

जिल्हा परिषद पशुवैद्यकीय विभागाच्यावतीने येथील पशू दवाखान्यातील कर्मचाºयांना निवासाची सोय व्हावी या उद्देशाने लाखो रुपये खर्चून निवास तयार करण्यात आले. सुमारे १५ वर्षांपुुर्वी तयार करण्यात आलेल्या या इमारतीत कोणताच कर्मचारी राहायला गेला नाही व त्याकडे ढुकुंनही बघितले नाही.

ठळक मुद्देशेंडा येथील प्रकार : जनतेच्या पैशांची लूट

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : जिल्हा परिषद पशुवैद्यकीय विभागाच्यावतीने येथील पशू दवाखान्यातील कर्मचाºयांना निवासाची सोय व्हावी या उद्देशाने लाखो रुपये खर्चून निवास तयार करण्यात आले. सुमारे १५ वर्षांपुुर्वी तयार करण्यात आलेल्या या इमारतीत कोणताच कर्मचारी राहायला गेला नाही व त्याकडे ढुकुंनही बघितले नाही. त्यामुळे ईमारतीची नासधूस धाली असून हे निवास ‘भूतबंगला’ झाल्याचे दिसत आहे.कर्मचारी गावातच राहिल्यास जनतेला चांगली सेवा देता येईल. या उद्देशातून लाखो रुपये खर्ची घालून गावात पशू दवाखान्याच्या कर्मचाºयांसाठी १५ वर्षे अगोदर ईमारत बांधकाम करण्यात आले होते. मात्र आजपावेतो या ईमारतीत एकही कर्मचारी राहायला गेला नाही. त्यामुळे इमारतीच्या आतील भाग भूत बंगल्यासारखा झाला आहे. परिणामी ही जनतेच्या पैशांची सर्रास लूट असल्याचा प्रकार आहे. आजघडीला या ईमारतीच्या सभोवताल गवत वाढले आहे. आतील भागाची परिस्थिती दयनीय झाली आहे.कुणाचीही देखभाल नसल्याने या ईमारतीचे दार, खिडक्या, पंखे व फिटिंग केलेले इलेक्ट्रीक साहित्य लंपास झाले आहे. या ईमारतीचा वाली नसल्याने तीचा उपयोग संडास व जुगार अड्यासाठी होत असल्याची चर्चा आहे. पशू दवाखान्याचे कर्मचारी त्या इमारतीत न राहताही नुसते कुलूप ठोकून नजर ठेवून असते तरी त्या इमारतीची नासधूस झाली नसती. अथवा त्या ईमारतीवर केलेला खर्च गावाच्या विकासकामात केला असता तर गावाचा कायापालट झाला असता, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.असाच प्रकार बोअरवेल संबंधात घडला आहे. चार वर्षापूर्वी याच विभागाकडून येथील पशू दवाखान्यात उपचारासाठी येणाºया जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून राणी दुर्गावती चौकातील बोअरवेलमध्ये मोटार टाकून पाणी नेण्याचा अयशस्वी प्रयोग करण्यात आला होता. परंतु पाण्याचा एक थेंबही पशू दवाखान्यात पोहूच शकला नाही. यामध्ये सुद्धा सुमारे दोन लाख रुपये वाया गेल्याचे बोलले जात आहे. जनतेचे हित लक्षात घेवून शासन योजना राबविते. मात्र प्रशासन त्या योजना बरोबर राबवित नसल्याचा आरोप केला जात आहे. किंवा कंत्राटदार व संबंधित अधिकाºयांचे हित लक्षात घेवूनच योजना राबविल्या जातात, हे कळायला मार्ग नाही.या संबंधाने माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता माहिती देण्याचे टाळण्यात आले.

टॅग्स :zpजिल्हा परिषद