शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वाचा फोडण्यासाठी कर्मचारी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:06 IST

राज्य शासनाद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रम शाळांमध्ये शासनाने नवीन निकष लावून अनेक शाळा बंद पाडल्या. कर्मचाऱ्यांना काम नाही, वेतन नाही, ही अट लावून कर्मचाऱ्यांवर समस्यांचा डोंगर उभा केला.

ठळक मुद्देआयुक्तांना निवेदन : अनुदानित आश्रम शाळेतील समस्या मार्गी लावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : राज्य शासनाद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रम शाळांमध्ये शासनाने नवीन निकष लावून अनेक शाळा बंद पाडल्या. कर्मचाऱ्यांना काम नाही, वेतन नाही, ही अट लावून कर्मचाऱ्यांवर समस्यांचा डोंगर उभा केला. या समस्यांना वाचा फोडण्यासाठी राज्यभरातील सर्व कर्मचारी एकवटले. तसेच स्वाभिमानी शिक्षक व शिक्षकेतर संघटनेच्या वतीने नागपूर आयुक्तांना समस्या त्वरित निकाली काढण्यासाठी निवेदन देण्यात आले.गेल्या अनेक दिवसांपासून अनुदानित आश्रमशाळांमध्ये नवनवे निकष लावून कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांपुढे अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी संघटनेचे राज्याध्यक्ष भरत पटेल, उपाध्यक्ष हिरालाल पवार, नागपूर विभाग अध्यक्ष भूमेश्वर रहांगडाले, नाशिक विभागीय अध्यक्ष भगवान महिरे, उपाध्यक्ष सुनील ससनकर, कार्यवाह मनोहर टेकाम, सदस्य रामराव सेलार यांच्यासह नागपूर विभागातील सर्व सभासद, पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते.या वेळी अनेक प्रलंबित मागण्यांबाबत नागपूर विभागीय आयुक्तांसह चर्चा करण्यात आली. समस्या त्वरित निकाली काढण्यासाठी साधकबाधक चर्चा करुन काही समस्या त्वरित निकाली काढण्याचे आश्वासन चर्चेअंती आयुक्त सावरकर यांनी दिले. असे नागपूर विभाग स्वाभिमानी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष भूमेश्वर रहांगडाले यांनी सांगितले.अशा आहेत मागण्यानिवेदनानुसार, अनुदानित आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना लावण्यात आलेले काम नाही, वेतन नाही ही अट रद्द करुन ‘काम द्या, वेतन द्या,’ त्वरित लागू करावे, कर्मचाऱ्यांचे समायोजन करुन नियमित वेतन द्यावे, शासकीय आश्रम शाळेत व वसतिगृहात समायोजन करावे, सामान्य प्रशासन विभागाचे ४ आॅक्टोबर २०१७ चे शासन निर्णय हे आदिवासी विभागाला लागू करुन त्वरित कार्यवाही करावी, आयुक्त कार्यालयाच्या समायोजनाचे आदेश असताना अनेक संस्था समायोजन करीत नाही त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, जुनी पेंशन योजना सुरु करावी, नाशिक विभागातील १४३३ शिक्षक कर्मचाऱ्यांपैकी नागपूर विभागातील ३६५ शिक्षकांना २००२ पासून मागील थकबाकी त्वरित देण्यात यावी. प्रयोगशाळा परिचर व स्त्री अधीक्षिका यांचे वेतन श्रेणीतील तफावत दूर करुन थकबाकी देण्यात यावी, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना कालबाह्य वेतनश्रेणी लागू करावी, पहारेकऱ्यांना वेतनश्रेणी लागू करावी, वैद्यकीय प्रतिपूर्ति बिले त्वरित काढावी, दरमहा १ तारखेला वेतन देण्यात यावे या मागण्यांचा समावेश आहे.