शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रॉनिक काट्यांची ‘अ‍ॅलर्जी’

By admin | Updated: April 8, 2016 01:32 IST

धान मोजणीत काटा मारून शेतकऱ्यांची लूट होऊ नये यासाठी पणन महामंडळाच्या आदेशावरून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने ...

वजन काट्यांनीच होते मोजणीगोंदिया : धान मोजणीत काटा मारून शेतकऱ्यांची लूट होऊ नये यासाठी पणन महामंडळाच्या आदेशावरून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची खरेदी केली. मात्र मागील वर्षी काटे खरेदी केल्यानंतरही त्यांना बगल देत आजही साधारण काट्यांवरच बाजार समितीत मोजणीचा प्रकार सुरू आहे. बाजार समिती प्रशासनाकडून याबाबत व्यापाऱ्यांकडून टोलवाटोलवीचे कारण सांगीतले जात आहे. यात मात्र प्रशासनाची भूमिका संशयास्पद असून बाजार समितीलाच इलेक्ट्रॉनिक काट्यांची ‘अ‍ॅलर्जी’ असल्याचे दिसते. उन्ह पावसात घाम गाळून पिक काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव मिळावा. तसेच धानाच्या मोजणीत काटा मारून त्यांची लूट होऊ नये याची खबरदारी घेत असलेल्या पणन महामंडळाने इलेक्ट्रीक काट्याने धानाची मोजणी करण्याचे निर्देश कृषी उत्पन्न बाजार समित्यांना दिले होते. महामंडळाच्या या आदेशाचे पालन करीत येथील बाजार समितीने २५ इलेक्ट्रॉनिक काटे खरेदी केले आहे. मागील डिसेंबर महिन्यात हे २५ इलेक्ट्रॉनिक वजन काटे सुमारे २.७५ लाख रूपयांत खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे.आता हे काटे खरेदी करून वर्ष लोटले ी४३आहे. मात्र खरेदी करण्यात आलेले हे काटे आजही बाजार समितीतील एका खोलीत कुलूपबंद पडून असावेत. पणन महामंडळाच्या आदेशावरून या इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची खरेदी करून बाजार समिती प्रशासनाने किती कर्तव्यदक्षतेने समितीचा कारभार सुरू आहे हे दाखवून दिले. मात्र काटे खरेदी केल्यानंतर त्यांचा वापर करण्यात प्रशासन फेल ठरत आहे. हेच कारण आहे की, वर्ष लोटूनही या इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांना बगल देत साधारण काट्यांवरच बाजार समितीतील मोजणीचा कारभार सुरू आहे. आज सर्वत्र नवनवीन यंत्राचा वापर केला जात आहे. जुन्या यंत्रांचा वापर सोडून नवीन तंत्रज्ञान अवलंबिले जात आहे. दुसरीकडे मात्र बाजार समितीत जुन्या यंत्रांचाच वापर होत असून नवीन तंत्रज्ञानाला बगल दिली जात असल्याने हा प्रकार संशयास्पद दिसून येतो. एकीकडे बाजार समितीकडून व्यापाऱ्यांना पत्र देऊन इलेक्ट्रॉनिक काट्यांनी मोजणी करण्याबाबत सूचविण्यात आले असल्याचे सांगीतले जात आहे. कधी मात्र हमाल ट्रेंड नसल्याने व्यापारी याचा विरोध करीत असल्याचे तर कधी समितीचे स्थानांतरण होणार असल्याने काटे काढले नसल्याचे कारण बाजार समिती प्रशासनाकडून सांगीतले जात आहे. येथे प्रशासनाकडून इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची सक्ती केली जाऊ शकते. मात्र असे होत नसल्याने बाजार समिती प्रशासनाचीही भूमिका संशयास्पद दिसते. (शहर प्रतिनिधी)