शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

मुंबई-हावडा रेल्वे मार्गाचे विद्युत तार तुटले

By admin | Updated: December 20, 2014 01:44 IST

मुंबई ते हावडा या रेल्वेमार्गावर गुरूवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास भंडारा ते कोका दरम्यान समरसता एक्सप्रेसचा पेंटो तुटला.

गोंदिया : मुंबई ते हावडा या रेल्वेमार्गावर गुरूवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास भंडारा ते कोका दरम्यान समरसता एक्सप्रेसचा पेंटो तुटला. त्यामुळे नागपूर ते रायपूर मार्गावरून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या एक ते दीड तास विलंबाने धावल्या. त्यामुळे प्रवाशांना हिवाळ्याच्या या दिवसात खूप त्रास सहन करावा लागला.मुंबई ते हावडाकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर भंडारा रेल्वे स्थानकातून समरसता एक्सप्रेस (१२१५१) सुटल्यानंतर भंडारा ते कोकादरम्यान सदर रेल्वेगाडीला विद्युत कनेक्शन जोडणारा पेंटो तुटल्यामुळे गाडीचा विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे दीड तासापर्यंत रेल्वेमार्ग बाधित झाला. यानंतर रेल्वेचे विद्युत कर्मचारी घटनास्थळी पोहचले. पेंटोची सुधारणा करून पुन्हा विद्युत पुरवठा पूर्ववतपणे सुरळीत करण्यात आला. या प्रकारामुळे नागपूर ते रायपूरकडे जाणाऱ्या सर्व एक्सप्रेस व लोकल रेल्वेगाड्या दीड तास विलंबाने धावल्या. रेल्वेगाड्या विलंबाने धावत असल्यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकात मोठ्या संख्येत प्रवाशांची गर्दी आढळली. त्यातच सध्याच्या दिवसात गोंदिया जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडत आहे. त्यामुळे रेल्वेस्थानक परिसरात थांबलेल्या प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रवाशी गाड्यांसह मालगाड्यांच्या येण्या-जाण्यावरसुद्धा याचे विपरित परिणाम पडले. परंतु रायपूर ते नागपूरकडे जाणारा मार्ग खुला असल्यामुळे या मार्गावर समस्या निर्माण झाली नाही. मात्र विलंबाने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांत रोष दिसून आला.या प्रकाराबाबत गोंदिया रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक आर.एन. कर यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की, समरसता एक्सप्रेसला विद्युत कनेक्शन जोडणारा पेंटो तुटण्याची माहिती मिळताच विद्युत कर्मचाऱ्यांचा दल तत्काळ रवाना करण्यात आला. तिथे सुधार कार्य करून गाड्यांचे परिचालन सुरळीत करण्यात आले, असे ते म्हणाले.