शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

धापेवाडाचे पाणी मिळण्यासाठी सतत चार दिवस वीज पुरवठा

By admin | Updated: February 28, 2015 01:02 IST

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने केल्या जाणाऱ्या विद्युत पुरवठ्यादरम्यान ग्रामीण भागात दररोज आठ तास लोडशेंडीग व आठ तास सिंगल फेज विद्युत पुरवठा ...

तिरोडा : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने केल्या जाणाऱ्या विद्युत पुरवठ्यादरम्यान ग्रामीण भागात दररोज आठ तास लोडशेंडीग व आठ तास सिंगल फेज विद्युत पुरवठा असे शेती फिडरसाठी वेळापत्रक तयार केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांंना रबी हंगामासाठी पिकांना पाणी देणे कठीण होते. यासंदर्भात आ.विजय रहांगडाले यांनी शासन स्तरावर केलेल्या पत्रव्यवहारानंतर यावर महत्वपूर्ण बैठक होऊन शेतकऱ्यांना सतत चार दिवस पूर्ण विद्युत पुरवठा देण्याचा निर्णय घेण्यात आला. धापेवाडा उपसा सिंचन टप्पा १ करीता १६ तास सतत वीज पुरवठा असून दररोज आठ तास भारनियमन होते. त्यात पाणी उपसा करण्यासाठी मोठमोठ्या मशीन वापरण्यात आल्या आहेत. त्या मशीन सुरळीत वेगात येण्यासाठी ६ तासांचा कालावधी लागतो. पर्यायाने दररोज १० तास पाण्याचा उपसा होऊन आठ तास भारनियमन झाल्याने पाण्याचा उपसा खंडीत होतो. पर्यायाने दुसऱ्या दिवशीसुध्दा ६ तास मशीनला सुरळीत सुरू होण्यासाठी लागतात. याचा परिणाम म्हणून शेवटपर्यत पाणी पोहचत नव्हते. या परिस्थितीत बदल करावा यासाठी आ. विजय रहांगडाले यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे, महावितरणचे मुख्य अभियंता बापट, अधीक्षक अभियंता फुलकर, धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प विभाग तिरोडाचे अभियंता वासटकर व तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यात यापुढे सतत चार दिवस विद्युत पुरवठा देवून उरलेले तीन दिवस भारनियमन देण्यात यावे, असे ठरले यामुळे शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत उपसा सिंचन योजनेचे पाणी पोहोचणार आहे. यातून शेतकरी रबीचे पीक घेऊ शकतील. (प्रतिनिधी)