शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रीकल वार्इंडिंगच्या व्यवसायाने ‘रीता’ला मिळाला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 11:39 IST

रीता भगत यांनी साई स्वयंसहायता महिला बचत गटाच्या माध्यमातून ‘इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स वार्इंडिंग’ दुकान थाटले. पतीसह मेहनत करून संसाराचा गाडा हाकत समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली.

ठळक मुद्देसाई स्वयंसहायता महिला बचत गट नियमित कर्ज परतफेडीचे मिळाले फळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मध्य प्रदेशातून रोजगारासाठी तिरोडा तालुक्याच्या बघोली येथे येवून भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या रीता प्रभूदयाल भगत यांनी आपल्या साई स्वयंसहायता महिला बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेवून ‘इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स वार्इंडिंग’ दुकान थाटली. दुकानात पतीसह मेहनत करून संसाराचा गाडा हाकत समाजात प्रतिष्ठा सुद्धा मिळवून दिली.गटात येण्यापूर्वी रीता गृहिणी म्हणून काम करायच्या. त्या मध्यप्रदेशातील राहणाऱ्या असून कुटुंबाची परिस्थिती योग्य नसल्यामुळे व पतीला काम नसल्यामुळे त्या बघोली येथे येवून राहू लागल्या. तेथे त्यांचे पती एका इलेक्ट्रीकल दुकानात तीन हजार रूपये महिन्याने कामावर लागले. सात वर्षांपासून भाड्याच्या घरातच संसार सुरू होता. मुले लहान असल्याने त्या कुठे कामावरही जावू शकत नव्हत्या. पतीच्या ३ हजार रूपयांच्या मिळकतीतच कुटुंबाचा प्रपंच करीत होत्या.एक दिवस सहयोगिनी व सीआरपी गावात आल्या व १० ते १२ महिलांना गोळा केल्या. त्यात रीताचाही समावेश होता. त्यात सहयोगिनी यांनी महिलांना गटाची संकल्पना सांगितली. सर्व महिलांनी घरी पतीला विचारून सांगू, उद्या या, असे सांगितले. मात्र रीताने याच बैठकीत गटात नाव टाकण्याचा निर्णय घेतला. पण एकता पतीला विचारून घ्यावे, असा विचार मनात आल्याने त्यांनी पतीला बचत गटाची माहिती दिली. पतीने परवानगी दिली.दुसºया दिवसी सीआरपी व सहयोगिनी मोहल्ल्यात आल्या व १८ जुलै २०१४ रोजी साई बचत गटाची स्थापना करण्यात आली. गटात एकूण १२ सदस्य आहेत. सर्व महिलांनी रीता यांनी सचिव म्हणून निवड केली. त्यांनीसुद्धा सचिव पदाची जबाबदारी हसतमुखाने स्वीकारली. दर महिन्याच्या २ तारखेला गटाची बैठक घेणे, रेकार्ड भरणे व पंचसूत्रीनुसार गट चालविण्याची जबाबदारी त्या पार पाडू लागल्या. एकदा त्यांच्या मुलाची प्रकृती बिघडल्याने त्यांना पैशाची गरज पडली. त्यांनी गटाची बैठक घेवून एक हजार रूपयांचा अंतर्गत कर्ज घेतला. तो पैसा मुलाच्या औषधोपचारावर खर्च केला.गटाच्या बैठकीत सहयोगिनी यांनी विविध प्रशिक्षण दिले. एका बैठकीत बँक कर्ज घेवून व्यवसाय करण्याबाबत माहिती सांगण्यात आली. ती माहिती रीता यांनी पतीला सांगितली. पतीपत्नी दोघांनी घरीच छोटीशी दुकान टाकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी गटाच्या बैठकीत बँक कर्जाविषयी चर्चा केली. गटातील सर्व महिलांनी मंजुरी दिली. त्यामुळे त्यांनी एकटीनेच १२ मे २०१५ रोजी आयसीआयसीआय बँकेचे ३८ हजार रूपयांचे कर्ज घेतले. त्यातून ‘इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स वार्इंडिंग’ दुकान सुरू केली.त्यांचा व्यवसाय चांगला चालायला लागला. या व्यवसायाच्या नफ्यातून त्या आयसीआयसीआय बँकेच्या कर्जाची किस्त २५०० रूपये नियमित भरू लागल्या. पण व्यवसायासाठी भाड्याचे घर लहान पडू लागले. त्यामुळे दोघा पती-पत्नीने विचार करून गावाकडील शेती विकून इकडे जागा घेवून घर बांधण्याचा निर्णय घेतला. दीड एकर शेती सहा लाख रूपयांत विकून इकडे जागा घेतली व स्वत:चे घर बांधले.त्यांचे आयसीआयसीआय बँकेचे कर्जसुद्धा संपत आले होते. त्यामुळे दोघांनी परत विचार करून पुन्हा कर्ज घेवून दुकान वाढविण्याचे ठरविले. रीता यांनी गटाची बैठक घेवून चर्चा केली व पुन्हा त्यांना कर्ज घेण्यासाठी सर्व महिलांनी मंजुरी दिली. त्यामुळे त्यांनी ८ जून २०१६ रोजी आयसीआयसीआय बँकेचे पुन्हा एक लाख रूपयांचे कर्ज घेतले व दुकान मोठी केली. तसेच दुकानात सामान भरण्यासाठी गटातून अनेकदा अंतर्गत कर्जही घेतले. त्यांनी गटातून आतापर्यंत ८६०० रूपयांचे अंतर्गत कर्ज घेतलेला आहे. तर त्यांची बचत २४५० रूपये जमा झाली आहे. त्यांनी पतीला स्वत:चा व्यवसाय सुरू करून दिल्यामुळे पतीला दुसºयांच्या दुकानात काम करावे लागत नाही. आज त्यांचे कुटुंब सुखी व आनंदी आहे. त्यामुळे त्यांनी बचत गटातील सर्व महिला, सीआरपी, सहयोगिनी, प्रेरणा ग्रामसंस्था, माविम व जीवनोन्नती अभियानाचे आभार मानले.

अल्पशिक्षित असूनही देत आहेत अनुभवातून प्रशिक्षणआज रीता यांची गटाच्या सचिव व प्रेरणा ग्रामसंस्थेच्या कोषाध्यक्ष अशी ओळख निर्माण झाली आहे. समाजात मानही मिळत आहे. आता त्या दुसऱ्या गटातील बुककिपर महिलांना रेकार्ड लिहिण्याचे प्रशिक्षण देतात. रीता जरी अल्पशिक्षित असल्या तरी त्या स्वत:चे रेकार्ड स्वत: लिहितात. सहयोगिनी व सीआरपी यांच्या सहकार्याने गटाच्या माध्यमातून त्या खूप काही शिकल्या. त्या अनुभवाचा फायदा आज दुसऱ्या गटातील महिलांना मिळत आहे.

पतीच्या व्यवसायात मदत व मुलांचे शिक्षणरीता आपल्या पतीसह दुकानात वार्इंडिंचे काम करून पतीला व्यवसायात मदत करतात. हे काम त्या पती व सहयोगिनी यांच्या प्रेरणेमुळे शिकल्या. पतीपत्नी दोघेही सदर व्यवसाय सुरळीत चालवित आहेत. या व्यवसायातून त्या आयसीआयसीआय बँकेच्या कर्जाची पाच हजार रूपयांची किस्त भरतात. तसेच मुलांचे शिक्षण व घरातील खर्च याच व्यवसायातून सांभाळत आहेत.

टॅग्स :Womenमहिला