शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

१० केंद्रांवर आज शिक्षक मतदार संघाची निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2017 01:28 IST

नागपूर विभागीय शिक्षक मतदार संघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी शुक्रवार दि.३ रोजी मतदान होत आहे.

गोंदिया : नागपूर विभागीय शिक्षक मतदार संघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी शुक्रवार दि.३ रोजी मतदान होत आहे. सर्व तालुकास्थळांसह नवेगावबांध आणि दवनीवाडा अशा एकूण १० ठिकाणी यासाठी मतदान केंद्र राहणार आहेत. जिल्ह्यातील ३३२१ शिक्षक मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजतादरम्यान मतदान होणार आहे. एकूण शिक्षक मतदारांमध्ये २६९७ पुरूष तर ६२४ स्त्री मतदार आहेत. सर्वाधिक ८४३ मतदार गोंदिया तालुक्यातील आहेत. गोंदियासह तिरोडा, आमगाव, सालेकसा, गोरेगाव, सडक-अर्जुनी, देवरी आणि अर्जुनी मोरगाव येथील तहसील कार्यालयात मतदान केंद्र राहणार आहे. तसेच दवनीवाडा येथे जि.प. प्राथमिक शाळेत तर नवेगावबांध येथे जि.प. हायस्कूलमध्ये मतदान होणार आहे. गुरूवारी (दि.२) मतदान केंद्रांवर संबंधित कर्मचारी मतदानाच्या साहित्यासह रवाना झाले.सर्वाधिक ८४३ मतदार गोंदिया केंद्रावर, ४२१ मतदार तिरोडा, १२९ दवनीवाडा, ४०१ आमगाव, १४१ सालेकसा, ३०१ गोरेगाव, २०५ सडक अर्जुनी, ३४६ देवरी, २२४ नवेगावबांध, तर ३१० मतदार अर्जुनी मोरगाव केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणार आहेत.या मतदानासाठी १३ प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. यामध्ये निवडणूक आयोगाच्या मतदार ओळखपत्राशिवाय पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, पॅन कार्ड, पदवी/पदविका प्रमाणपत्र छायाचित्रासह, राज्य/केंद्र/सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिलेले संबंधित विभागाचे ओळखपत्र, पोस्ट/बँकांचे छायाचित्रासह असलेले ३१ डिसेंबर २०१६ पुर्वीचे पासबुक, संपत्तीविषयक नोंदणी, विक्रीपत्र ज्यामध्ये पासपोर्ट आकाराचे छायाचित्र असलेले दस्ताऐवज, छायाचित्रासह असलेले रेशन कार्ड, मागासवर्ग असल्याचे छायाचित्रासह प्रदान केलेले प्रमाणपत्र, छायाचित्रासह असलेला शस्त्र परवाना, दिव्यांग व्यक्तीचे छायाचित्रासह प्रमाणपत्र, आधारकार्ड व स्मार्ट कार्ड आदी प्रकारच्या कागदपत्रांचा समावेश आहे. (जिल्हा प्रतिनिधी)