शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

निवडणूक निरीक्षकांनी घेतला तयारीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 06:00 IST

आढावा सभेत माहिती देतांना जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी मध्यप्रदेश राज्याच्या बालाघाट आणि छत्तीसगड राज्याच्या राजनांदगाव जिल्ह्याला लागून गोंदिया जिल्ह्याची सीमा आहे. जिल्ह्यातील आमगांव आणि अर्जुनी मोरगाव हे विधानसभा मतदासंघ नक्षल प्रभावित आहे.

ठळक मुद्देमतदारसंघनिहाय घेतली माहिती : आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघाकरीता भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या सामान्य निवडणूक निरीक्षक आणि पोलीस निवडणूक निरीक्षक यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवडणूक तयारीचा आढावा घेतला.या वेळी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, सामान्य निवडणूक निरीक्षक मंजूर अली (अर्जुनी/मोरगाव), राजीव मेहता (तिरोडा), शौकत अहमद प्यारे (गोंदिया), धनंजयसिंग भदोरीया (आमगाव), पोलीस निवडणूक निरीक्षक धर्मवीर (अर्जुनी मोरगाव), सुधीरकुमार पोरीका (तिरोडा), जी.जी.पांडे (गोंदिया), टी. ईक्का (आमगाव), जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे उपस्थित होते.आढावा सभेत माहिती देतांना जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी मध्यप्रदेश राज्याच्या बालाघाट आणि छत्तीसगड राज्याच्या राजनांदगाव जिल्ह्याला लागून गोंदिया जिल्ह्याची सीमा आहे. जिल्ह्यातील आमगांव आणि अर्जुनी मोरगाव हे विधानसभा मतदासंघ नक्षल प्रभावित आहे. या मतदारसंघातील मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ या दरम्यानची आहे. गोंदिया आणि तिरोडा या मतदारसंघातील मतदानाची वेळ ही सकाळी ७ ते सायंकाळी ६ या दरम्यान आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी मतदार जागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागात विविध उपक्र म राबविण्यात येत आहे.१८ वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांनी मतदानासाठी यावे यासाठी त्यांना प्रोत्साहीत करण्यात येत असल्याचे सांगितले.डॉ. बलकवडे या वेळी म्हणाल्या,मतदार जागृतीसाठी जिल्ह्यात १०३ ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट व कंट्रोल युनीट वापरण्यात येत आहे. मतदान केंद्राची माहिती मतदान केंद्रावर असलेल्या सुविधा, निवडणूक प्रक्रियेसाठी असलेले मनुष्यबळ, वाहनांची उपलब्धता, सीव्हीजीलवर प्राप्त तक्र ारी आणि चारही विधानसभा मतदारसंघात १० लाख ९६ हजार ४४१ मतदार आपला मतदानाचा हक्क १२८२ मतदान केंद्रावरुन बजावणार असल्याचे सांगितले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी,स्वीपचे नोडल अधिकारी एस.ई.ए.हाश्मी, पोलीस उपअधीक्षक (गृह) सोनाली कदम, खर्च विषयक बाबीचे नोडल अधिकारी विकास राऊळकर, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पंकज गजभिये, जिल्हा प्रशासन अधिकारी जाधव, उपजिल्हाधिकारी राहूल खांदेभराड, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तांबे, सीव्हीजीलच्या नोडल अधिकारी प्रणती बुलकुंडे उपस्थित होते.टोल फ्री क्रमांकावरील तक्रारींची घेतली माहितीमागील निवडणुकीत ज्या ठिकाणी मतदान कमी झाले आहे. त्या ठिकाणी मतदार जागृतीच्या माध्यमातून विविध उपक्र म राबवावे, त्यामुळे जास्तीत जास्त मतदान होण्यास मदत होईल.ज्या ठिकाणी मतदान कमी झाले आहे,त्याची कारणे शोधून जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी पुढाकार घ्यावा. उमेदवाराच्या प्रत्येक बातमीवर लक्ष असावे. ते प्रचारासाठी वापरणार असलेल्या ध्वनीचित्रफित, बल्क एसएमएस, जाहिराती याबाबतची पूर्व परवानगी घेऊनच त्यांचे प्रसारण करावे असे सांगितले.१९५० तक्र ार नंबरवर प्राप्त तक्र ारीची माहिती घेतली.मोबाईल कवरेज एरीया जिल्ह्यात कोणत्या क्षेत्रात नाही याबाबतची माहिती निवडणूक निरीक्षकांनी घेतली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019