शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चार ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 00:15 IST

जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १६ आॅक्टोबर रोजी होत आहेत. यापैकी ४ ग्राम पंचायतीच्या निवडणूक ही बिनविरोध पार पडली आहे.

ठळक मुद्देएका ग्रामपंचायतीवर बहिष्कार : ३४२ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १६ आॅक्टोबर रोजी होत आहेत. यापैकी ४ ग्राम पंचायतीच्या निवडणूक ही बिनविरोध पार पडली आहे. त्यामुळे आता केवळ ३४२ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे.येत्या १६ आॅक्टोबरला जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होवू घातली आहे. १६ तारखेला मतदान तर १७ तारखेला मतमोजणी होणार आहे. त्यासाठी प्रशासन कामाला लागला आहे. जिल्ह्यातील चार गावात सरपंच आणि सदस्यांची निवड गावकºयांनी बिनविरोध केली. तर सालेकसा तालुक्यातील आमगाव खुर्द येथील नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.त्यामुळे ३४७ पैकी आता ३४२ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदाच्या निवडणुकीपासून सरपंचाची निवड ही थेट जनतेतून केली जाणार असल्याने उमेदवारांमध्ये चांगली चूरस पाहयला मिळत आहे.निवडणुकीत शासनाचा खर्च होऊ नये यासाठी चार ग्रामपंचायतीने अविरोध निवडणूक करण्यास पुढाकार घेतला. त्यात तिरोडा तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत आहे. ही ग्रामपंचायत सरपंचासह आठ सदस्य असलेली आहे.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील येरंडी दर्रे ही ग्रामपंचायत सरपंचासह आठ सदस्य असलेली असून या ही ग्रामपंचायतीने अविरोध निवड केली आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गोठणगाव या ग्रामपंचायतीची १० सदस्य संख्या असून या ही ग्रामपंचायतीने अविरोध निवडणुक झाली आहे.तसेच देवरी तालुक्याच्या मगरडोह येथील सरपंचासह आठ सदस्य संख्या असलेल्या या नक्षलग्रस्त भागातील ग्रामपंचायतीने अविरोध निवडणुक करुन शासनाचा खर्चाची बचत केली आहे. आमगाव खुर्द नगर परिषद व्हावी या मुद्दाला घेऊन येथील गावकºयांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गोंदिया जिल्ह्यातील ३४२ ग्रामपंचायतीची निवडणुक सोमवार (दि.१६) होत आहे.