शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
6
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
7
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
9
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
10
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
11
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
12
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
13
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
14
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
15
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
16
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
17
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
18
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
19
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
20
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप

आठ शाळा ठरल्या अनधिकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 21:37 IST

शासनाची परवनागी न घेता सर्रासपणे कारभार चालविणाऱ्या स्वयं अर्थसहाय्यीत शाळांची तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात गोंदिया जिल्ह्यातील आठ शाळा अनाधिकृत असल्याची बाब पुढे आली आहे. तर एका शाळेला परवानगी आहे किंवा नाही या संभ्रमात स्वत: शिक्षण विभाग आहे.

ठळक मुद्दे२४ तासात शाळा बंद करण्याचे पत्र : क्वालिटी पब्लिक शाळेचे नाव यादीत नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाची परवनागी न घेता सर्रासपणे कारभार चालविणाऱ्या स्वयं अर्थसहाय्यीत शाळांची तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात गोंदिया जिल्ह्यातील आठ शाळा अनाधिकृत असल्याची बाब पुढे आली आहे. तर एका शाळेला परवानगी आहे किंवा नाही या संभ्रमात स्वत: शिक्षण विभाग आहे.शिक्षण हक्क कायद्यातील तरतूदीच्या कलम १८ नुसार कारवाई करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालक पुणे यांनी दिले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील स्वयं अर्थसहाय्यीत ११६ शाळांची तपासणी करण्यात आली. वर्ग १ ते ५ व वर्ग १ ते ८ वी च्या स्वयं अर्थसहाय्यीत शाळा आहेत. त्या शाळांची तपासणी करण्यात आली. त्यात गोंदिया तालुक्यातील पाच शाळा, सडक-अर्जुनी, आमगाव व देवरी या तालुक्यातील प्रत्येकी एक शाळा अनाधिकृत असल्याचे या तपासणीत उघडकीस आले.गोंदिया तालुक्यातील देवेंद्र प्राथमिक स्कूल अदासी-तांडा, दशमेश पब्लीक स्कूल हिवरा, बुध्दीष्ठ इंटरनॅशनल स्कूल घिवारी, मातोश्री शिशू मंदिर छिपीया, डी.डी.अग्रवाल पब्लीक स्कूल अदासी-तांडा, सडक-अर्जुनी तालुक्यातील बुध्दीष्ठ इंटरनॅशनल शाळा सौंदड, आमगाव तालुक्यात बुध्दीष्ठ इंटरनॅशनल शाळा आमगाव, देवरी तालुक्यात सनसाईन पब्लीक स्कूल देवरी या आठ शाळांना अनाधिकृत ठरविण्यात आले. त्यामुळे शिक्षण विभाग किती तत्परतेने कारवाही करते याकडे लक्ष आहे.अनधिकृत शाळेच्या यादीत क्वालिटीचा समावेशच नाहीसन २०१८-१९ या सत्रासाठी अनाधीकृत शाळा म्हणून जिल्ह्यातील आठ शाळांचा समावेश करण्यात आला. परंतु या यादीत आमगाव येथील क्वालीटी पब्लीक स्कूलचा समावेश नाही. एकीकडे या शाळेला परवानगीच नाही असे शिक्षण विभागाची ओरड आहे. तर दुसरीकडे त्या शाळेला अनाधिकृत म्हणूनही घोषित केले नाही. संस्थेचा अंतर्गत कहल असल्यामुळे हे प्रकरण पोलिसात गेले असून चौकशी होईपर्यंत या शाळेला अनाधिकृत शाळांच्या यादीत टाकणे योग्य समजले जाणार नाही असे शिक्षण विभागाच्या एका अधिकाºयाचे म्हणणे आहे.२४ तासांच्या आत शाळा बंद करण्याचे पत्रजिल्हा परिषद गोंदियाचा प्राथमिक शिक्षण विभाग क्वालीटी पब्लीक शाळेचा अंतर्गत कलह समजून त्या शाळेला अनाधिकृत शाळेच्या यादीत टाकले नाही. परंतु त्याच प्राथमिक शिक्षण विभागातील आमगाव येथील गटशिक्षणाधिकारी यांनी १५ मे रोजी स्व. पोहूमल राष्ट्रीय शिक्षण संस्था व बहुउद्देशिय शिक्षण संस्था गोंदियाच्या अध्यक्ष, सचिवांच्या नावाने पत्र काढून क्वालीटी पब्लीक स्कूलला तत्काळ बंद करून २४ तासाच्या आत आपल्या कार्यालयाला अहवाल सादर करा अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पत्रातून दिला आहे.

टॅग्स :Schoolशाळा